Tarun Bharat

अजब.. युवतीचा 80 वर्षीय वृद्धाशी विवाह

Advertisements

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन येथील अनोखे दांपत्य

खरं प्रेम कधी आणि कुणासोबत होईल हे सांगता येत नसल्याचे म्हटले जाते. काहीसा असाच प्रकार दक्षिण आफ्रिकेच्या केपटाउन शहरात घडला असून तेथे 29 वर्षीय विद्यार्थिनीने ‘खरं प्रेम’ झाल्यावर 80 वर्षीय वृद्धासोबत विवाह केला आहे. दोघांमधील वयात सुमारे 51 वर्षांचे अंतर आहे. माझे पती विल्सन रासमुस ‘अत्यंत काळजी’ घेणारे प्रियकर आहेत असे त्यांची पत्नी तेरजेल रासमुसने म्हटले आहे. पण तिने याचबरोबर विल्सन यांच्या मुलांसाठी सावत्र आईची भूमिका पार पाडू शकत नसल्याचे मान्य केले आहे. विल्सन यांची मुलेही तेरजेलपेक्षा 30 वर्षांनी मोठी आहेत.

पाहताक्षणी प्रेमात

2016 मध्ये या प्रेमकथेला प्रारंभ झाला होता. पहिल्या भेटीतच दोघेही परस्परांच्या प्रेमात पडले होते. माझ्या प्रियकराला नात-पणतू असूनही त्याचे प्रेम ‘निष्पाप आणि शानदार’ असल्याचे तेरजेल सांगते. या प्रेमातून विल्सनला वृद्धत्वात देखरेख करण्यासाठी साथीदार मिळाली तर तेरजेलला एक बुद्धिमान पती आणि त्याच्या जीवनाचा अनुभव मिळाला आहे. तेरजेलच्या आईनेही हे नातं मान्य केले आहे. या विवाहात विल्सन यांची 56 वर्षीय मुलगी साक्षीदार ठरली आहे.

अनोखी प्रेमकथा

विल्सन माझ्या आयुष्यात हळूवारपणे आले. पहिल्या भेटीच्या तीन महिन्यांनी विल्सन यांच्यासोबत विवाह करण्याचा माझा निर्धार झाला होता. विल्सन यांच्या पहिल्या पत्नीचा 2002 मध्ये मृत्यू झाला होता असे तेरजेलने सांगितले. वयात प्रचंड फरक असूनही परस्परांना पूरक असल्याचे दोघांचे मानणे आहे.

Related Stories

शासकीय यंत्रणेचा वापर करून मुश्रीफांनी १५०० कोटीचा भ्रष्टाचार केला: किरीट सोमय्या

Archana Banage

कोरोना काळात देवदूत बनलेला अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

Himachal Khalistan Flags: हिमाचल प्रदेशने राज्याच्या सीमा केल्या बंद

Archana Banage

फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांची प्रकृती पुन्हा बिघडली; ICU मध्ये दाखल

Tousif Mujawar

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन

Tousif Mujawar

मॉडेलच्या एका दाताची किंमत लाखांमध्ये

Patil_p
error: Content is protected !!