Tarun Bharat

अजय देवगण यांच्याकडून ‘पॅनोरमा म्युझिक’चा श्रीगणेशा

सिनेनिर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱया कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी ‘पॅनोरमा म्युझिक’ या संगीतमय लेबलची नुकतीच घोषणा केली आहे. बालिवूड स्टार अजय देवगण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पॅनोरमा म्युझिकच्या लेबलचं प्रमोशन करणारा व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी आपले चाहते आणि संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवली असून, चॅनल सबक्राइब करून सुमधूर संगीताचा आस्वाद घेण्याचे आवाहनही केलं आहे.

पॅनोरमा म्युझिकचे नेतृत्व राजेश मेनन करणार आहेत. या लेबलअंतर्गत ओरिजनल सिंगल्स, चित्रपट संगीत, स्वतंत्र संगीत आणि प्रादेशिक कॉन्टेंटची निर्मिती केली जाणार आहे. संगीतकारांसोबतच कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ देण्याच्या हेतूनं सुरू केलेलं हे लेबल प्रादेशिक भाषेतील संगीत निर्मितीवर विशेष भर देईलच, पण यासोबतच हिंदी निर्मीतीमध्ये मुख्यतः सूफी, गझल आणि भक्तिमय अशा विविध संगीतरचनांचा समावेश करण्यात येईल. पॅनोरमा म्युझिकच्या घोषणेच्या निमित्तानं अजय देवगण म्हणाले की, ‘संगीताचं माझ्या मनात वेगळं स्थान असल्यानं संगीताची आवड मी कायम जोपासली आहे. डिजिटल माध्यमांमुळे संगीतामधील संधी वाढल्या आहेत. भारताला एक समृद्ध संगीत परंपरा लाभली असून, यातील अद्याप अनेक पैलू समोर आलेले नाहीत. पॅनोरमा म्युझिक हे पॅनोरमा स्टुडिओचं योग्य दिशेनं टाकलेलं पाऊल असून, मी त्यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा देत आहे.

Related Stories

हीरामंडी’मध्ये मनीषाची एंट्री

Patil_p

‘टकाटक’च्या यशानंतर आता येणार ‘टकाटक 2’

Tousif Mujawar

13 जानेवारीला झळकणार ‘कुत्ते’

Patil_p

खुशाली कुमारसोबत दिसणार माधवन

Amit Kulkarni

तब्बूकडून ‘दृश्यम 2’चे चित्रिकरण सुरू

Amit Kulkarni

आई माझी काळुबाई मालिकेचे पन्नास भाग पूर्ण

Patil_p
error: Content is protected !!