Tarun Bharat

अजिंक्यतारा पुन्हा होरपळला….

प्रतिनिधी/ सातारा

किल्ले अजिंक्यतारा पुन्हा आगीत होरपळला, शुक्रवारी भर दुपारी लागलेल्या आगीमुळे अनेक वृक्षांसह काही प्राण्यांचाही मृत्यू झाला. अज्ञातांनी लावलेल्या या लहानशा अगीचे वणव्यात रूपांतर होऊन बहुसंख्य जैवसंपदेचा मोठय़ा प्रमाणात नाश झाला आहे. कित्तेक तास या आगीचे लोट व धुर मोठय़ा प्रमाणात दिसत होते.

 मागील महिन्यात ही अशाच प्रकारे या किल्यावर वणवा लागला होता. त्यावेळी बहुसंख्य वनस्पती यावणव्यात होरपळुन निघाल्या होत्या. शुक्रवारी ही अशाच प्रकारची घटना घडली यामध्ये विविध औषधी वनस्पतींचा हा तितक्याच प्रमानात नुकसान झाले आहे. सध्या लॉकडाऊन करण्यात आल्याने या किल्यावर नागरिकांची येजा ही नसते. त्यामुळे ही आग कोणी जाणून बुजून तरी लावली नसेल का असा संशय ही व्यक्त करण्यात येतो. हा वणवा विझविण्यासाठी अग्निशामन दलाचे प्रारंभी दोन बंब ही किल्यावर दाखल झाले होते. येथे उपस्थित पर्यावरण प्रेमींच्या सहय्याने हा वणवा विझविण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पण वणवा अधिक प्रमाणात पेटला असल्याने सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा अग्निशमन दलाचे दोन बंब रवाना झाले. शेवटी अथक प्रयत्नाने हा वणवा विझविण्यात यश आले. या वणव्याचे स्वरूप इतके होते की सायंकाळी 7 वा. पर्यंत वणवा विझविण्याचे काम सुरूच होते.

Related Stories

महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला; 8.8 अंशावर घसरले तापमान

Tousif Mujawar

साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक

datta jadhav

सातारा शहर व परिसरात पावसाची रिपरिप

Patil_p

23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

Patil_p

सातारा : मटका एजंट ताब्यात, दोघांवर गुन्हा दाखल

Archana Banage

कोयने पाठोपाठ वारणेचा विसर्ग कमी; कृष्णा सुरक्षित पाणी पातळीवर

Archana Banage