Tarun Bharat

अजिंक्यतारा वरुन येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करा

प्रतिनिधी / सातारा

अजिंक्यतारा किल्ल्यावरुन गोडोली गणात तीन ओढे येतात. त्या ओढय़ातून येणाऱ्या पाण्यामुळे पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. हे पाणी मुख्यत: ओढय़ाच्या स्वच्छते अभावी तुंबून राहते, स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनी केली आहे

त्यांनी सभापती सरिता इंदलकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरालगत असणाऱ्या गोडोली गण हा त्रिशंकू भागात येतो. याच भागात किल्ले अजिंक्यतारा येथून येणारे तीन आढे आहेत. पावसाळयात या ओढयांना पाणी येते. हे पाणी मुख्यत: ओढय़ाच्या स्वच्छतेअभावी तुंबून राहते. त्यामुळे ओढय़ाला पुरनिर्माण परिस्थिती होते. या पुरामुळे त्रिशंकू भागात तसेच नगरपालिका क्षेत्रात बऱ्याच नागरी वसाहतीला पुराचा तडाखा बसून लोकांचे जनजीवन विस्तकळीत होते. त्याचप्रमाणे या त्रिशंकू भागातील गटारे घाणीमुळे चोकअप होत असल्याने पावसाळयातील गटारातून वाहणारे पाणी हे मानवी वसाहतीत इतरत्र पसरुन परिसरात दुर्गंधी निर्माण होते. साथीचे रोग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या चालू हंगामात पावसाळा सुरु होण्यापूर्वी ओढय़ांची स्वच्छता करुन घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

सातारा : महागाईने मोडले सर्वसामान्यांचे कंबरडे

Archana Banage

शेवटचा सोमवार उत्साहात

Patil_p

छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीची छापेमारी

datta jadhav

सांगलीच्या तरणजित धिल्लोची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

Archana Banage

राष्ट्रवादी काँग्रेसने अपक्षांना दिली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची संधी

datta jadhav

हरिभाऊ राठोडांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी

Tousif Mujawar