Tarun Bharat

अजिंक्यताऱयावर मावळ्यांनी राबवली संवर्धन मोहीम

सुर्योदय बुरूजाची 70 मावळ्य़ांकडून स्वच्छता

प्रतिनिधी / सातारा

धर्मरक्षक राजधानी सातारा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विध्यमाने रविवारी अजिंक्यतारा संवर्धन मोहीम यशस्वी रित्या पार पडली. यामध्ये 70 मावळे सहभागी झाले होते. या मोहिमेत किल्ल्यावरील सूर्योदय बुरुज परिसराची स्वच्छता करण्यात आली.

रविवारी धर्मरक्षक राजधानी सातारा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व राष्ट्रीय स्वयंसेवक अशा तीन संस्थांच्या 70 जणांनी या मोहीमेत सहभाग घेतला होता. गेली तीन वर्षे अजिंक्यताऱयावर सातत्याने संवर्धन मोहीम होत आहे. रविवार दि. 11 ऑक्टोबरला अजिंक्यतारा संवर्धन मोहीम यशस्वी रित्या पार पडली. या मोहिमेत बऱयाच दिवसांपासून अजिंक्यताऱयाचा सुर्योदय बुरूज माती खाली बुजून गेला होता. सर्व मावळ्यांनी मिळून या बुरूजावरची माती काढण्यास सुरुवात केली आहे. बऱयाच प्रमाणात हा मातीचा ढीग साठला असल्याने एका दिवसात निघणं शक्य नाही, परंतु अजून पुढे अशाच मोहीमा राबवून श्रमदानातून हे कार्य केलं तर अशक्य नाही.

या मोहिमेत अभिजित सुर्वे, हर्षवर्धन माळी, शेखर पंडित, शुभम देशमुख, ओमकार गाढवे, विशाल शिंदे, सुहास माळी, सौरभ बनकर, अविनाश सुतार, आकाश सणस, सचिन नाईक, त्रृुषीकेश कापसे, ओमकार मगदुम, अक्षय शिंदे, अमित कांबळे, शुभम ठिगळे, संदिप कुंभार, विशाल जाधव यांच्या इतर सहभागी झाले होते.

Related Stories

राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार

Patil_p

पूरनियंत्रण सोडण्यात येणारे पाणी माण-खटावला द्यावे

Patil_p

पुणे-मिरज-लोंढा विद्युतीकरण ७० टक्के पूर्ण

Archana Banage

वाईतील मिसींग तक्रारीच्या अनुषंगाने तपास

Patil_p

आज शरद पवारसाहेब साताऱयात

Patil_p

साताऱयातील 7 शैक्षणिक संकुलात संविधानाचा जागर

Patil_p