Tarun Bharat

अजिंक्य देव होणार बाजीप्रभू

स्टार प्रवाहवर लवकरच ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका सुरू होतेय. अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य देव या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर कमबॅक करत आहेत.

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावणाऱया छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांची शौर्यगाथा या मालिकेच्या रुपात उलगडणार आहे. या मालिकेतून सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव छोटय़ा पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ते या मालिकेत बाजीप्रभू देशपांडे साकारणार आहेत. ही ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी ते खुपच उत्सुक आहेत.

अजिंक्य देव आपल्या भूमिकेविषयी सांगतात, माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा चित्रपटातील ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे.अजिंक्य देव पुढे सांगतात, फिटनेसच्या बाबतीच मी नेहमीच जागरुक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे. स्टार प्रवाह सध्याची नंबर वन वाहिनी आहे. याआधी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमाच्या काही भागांचं मी सूत्रसंचालन केलं होतं. त्यामुळे पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत या मालिकेच्या निमित्ताने काम करण्याचा योग आला आहे. स्टार प्रवाह प्रस्तुत ‘जय भवानी जय शिवाजी’या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून 26 जुलैपासून रात्री 10 वाजता  ही गोष्ट भेटीला येणार आहे.

Related Stories

दख्खनचा राजा ज्योतिबातून उलगडणार उन्मेष अश्वाची कथा

Patil_p

दीनदयाळांच्या व्यक्तिरेखेत अन्नू कपूर

Patil_p

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेने पूर्ण केले 100 भाग

Patil_p

‘सत्यनारायण की कथा’मध्ये श्रद्धा कपूर

Amit Kulkarni

सई ताम्हणकरला मिळाला ड्रिमबॉय

Patil_p

आमरस आणि मिसळ पार्टी

Patil_p