Tarun Bharat

अजित पवारांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कार्यालय व निवासस्थानी दुसऱ्या दिवशीही आयकरची तपासणी

-बंदोबस्तात रात्री उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी

प्रतिनिधी/कोल्हापूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कोल्हापूरातील राजारामपुरी येथील मुक्ता पब्लिकेशन कार्यालय व पिरवाडी येथील निवासस्थान येथील आयकर कारवाई दुसऱया दिवशीही सुरू होती. या ठिकाणी उशीरापर्यंत कागदपत्रंाची तपासणी सुरू होती. या दोन्ही तपासणी ठिकाणी सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या कारवाइं&बाबत अधिकाऱयाकडून कोणतीच माहीती मिळू शकली  नाही.

गुरूवारी शरद पवार आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांवर  आयकर विभागाने कोल्हापूरसह विविध भागामध्ये एकाच वेळी  छापे टाकले. या छाप्यामुळे राज्यात मोठीच खळबळ उडाली. गुरूवारी सकाळी सहा वाजता कोल्हापूरातील राजारामपुरी मेनरोडवरील नववी गल्ली येथील कार्यालय व पीरवाडी (ता. करवीर) येथील निवासस्थानी छापा टाकण्यात आला.

दुसऱया दिवशीही या दोन्ही ठिकाणी कारवाई सुरू होती. अनेक महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी व र्कांम्प्युटरमधील डाटा ताब्यात घेण्याची प्रक्रीया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. यासाठी जादा अधिकाऱयांना पाचारण करण्यात आले असल्याचे समजते. राजारामपुरी येथील पब्लिकेशन कार्यालयात रात्री उशीरापर्यंत अधिकारी उपस्थित राहून कागदपत्रांची पाहणी करत होते. या ठिकाणी कोणासही येण्यास मज्जाव होता.

Related Stories

कळंबा कारागृहात मोबाईल

Archana Banage

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेचे कोल्हापुरात दहन

Archana Banage

सांगलीतील वृद्ध महिलेची महिनाभराच्या ताटातूटीनंतरनंतर तिच्या कुटुंबीयांशी झाली भेट

Archana Banage

पेगॅसस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ निर्णय

Archana Banage

कोल्हापूर : कर्जदारांभोवती खासगी सावकारांचा पाश

Archana Banage

शाहू ग्रुप मार्फत भव्य ‘राजर्षि छ. शाहू महाराज कागल मॅरेथॉन’ स्पर्धा

Abhijeet Khandekar