Tarun Bharat

अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू; संजय राऊतांचा राणेंना अप्रत्यक्ष इशारा

नाशिक/प्रतिनिधी

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी २४ ऑगस्ट रोजी संगमेश्वर येथे राणेंना अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मिळाला. त्यांनतर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. राणेंची सध्या कोकणात जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. तर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहे. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. त्यांनी अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू, असा राणेंना अप्रत्यक्ष इशारा दिला. राऊत यांनी बोलताना, आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना संजय राऊत यांनी हे विधान केलं. नाशिकमध्ये शिवसेनेचे वातावरण आहे. सरकारला नाशिक सारख्या शहरांची ताकद मिळत राहिली पाहिजे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून टाकू. कार्यक्रम केल्यावर परिणामांची पर्वा करत नाही, असं राऊत म्हणाले.

Related Stories

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10 हजार पार

Tousif Mujawar

बुधवारी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी करणार

Patil_p

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

datta jadhav

पंजाब : मनप्रीत सिंह बादलसह 1310 पॉझिटिव्ह रुग्ण

Tousif Mujawar

अमेरिकेच्या टेक्सास, फ्लोरिडात पुन्हा निर्बंध

datta jadhav

सूनेचा खून आणि नातवांना जखमी केल्याप्रकरणी सासऱ्यास जन्मठेप

Archana Banage
error: Content is protected !!