Tarun Bharat

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

इस्लामपूर / प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे पुणे-बेंगलोर महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षीय मादी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत कासेगाव पोलिसांनी शिराळा वनविभागास माहिती दिली. त्या नंतर वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक अमोल साठे, वनकर्मचारी बाबासाहेब गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. मादी जातीचा सुमारे अडीच ते तीन वर्षाचा आहे. इस्लामपूर येथील वनविभागाच्या कार्यालयात सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, मानद वन्यजीव रक्षक डॉ. अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांच्या उपस्थितीत डॉ. अंबादास माडकर यांनी शवविच्छेदन करण्यात आले.

Related Stories

Sangli; म्हैसाळ आत्महत्या प्रकरणी आणखी तिघांना अटक

Abhijeet Khandekar

नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास, कारण नसताना वाद निर्माण करू नये

datta jadhav

भारतातील परिस्थिती भयानक! काही आठवडे लॉकडाऊन गरजेचे

Tousif Mujawar

न्यूयॉर्क : टाईम स्क्वेअरमध्ये भारतीय नागरिकांकडून चीनविरोधात निदर्शने

datta jadhav

Vedanta & Foxconn :”मोदी ने क्या दिया? लॉलीपॉप लॉलीपॉप” म्हणत पुण्यात, मुंबईसह कोल्हापुरात विरोधकांकडून आंदोलन

Archana Banage

कंगना राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; सोशल मिडीयावर चर्चा

Kalyani Amanagi