Tarun Bharat

अज्ञात वाहनाच्या धडकेत विद्यार्थी ठार

उगार-शिरगुप्पी रस्त्यावर अपघात : पहाटे फिरावयास गेल्यावर दुर्घटना

वार्ताहर/ शिरगुप्पी

पहाटे फिरावयास गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. तर अन्य एक युवक जखमी झाला. हा अपघात शिरगुप्पी -उगार रस्त्यावर रविवारी पहाटे 5 च्या सुमारास घडला. सुशांत सिद्धाप्पा डेंगी (वय 15) असे ठार झालेल्या विद्यार्थ्याचे तर रमजान मुजावर (वय 21) असे जखमी युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत सुशांत डेंगी, रमजान मुजावर हे आपल्या मित्रांसमवेत दररोज पहाटे व्यायामासाठी शिरगुप्पी-उगार रस्त्यावर जात होते. रविवारी पहाटे अज्ञात वाहनाने रस्त्यावर असणाऱया सुशांत व रमजान यांना जोराची धडक दिली. यामध्ये सुशांत याचा जागीच मृत्यू झाला. तर रमजान हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह घटनास्थळावरुन पळ काढला.

मयत सुशांत हा मूळ विजापूर जिल्हय़ातील असून त्याचे आई-वडील शेतमजुरी करतात. ते सध्या येथील राजू कागे नगरमध्ये वास्तव्यास आहेत. सुशांत येथील खासगी शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या अपघाती निधनाने शिरगुप्पी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुशांतवर सोमवारी सायंकाळी त्याच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी कागवाडचे फौजदार हनुमंत शिरहट्टी, रंगारेडी वंटगोडी यांनी भेट देऊन पाहणी केली.

Related Stories

आम्हाला तातडीने वेतन व भत्ता द्या

Patil_p

शहरातील रिक्षा-टमटमचे अडथळे दूर करा

Amit Kulkarni

खंडेनवमीची तलवार, नंतर प्रेयसीवर वार

Patil_p

रात्री 10 नंतर अनावश्यक फिरणाऱयांवर नजर

Amit Kulkarni

आणखी 11 जण कोरोनामुक्त

Patil_p

आरपीडी महाविद्यालयामध्ये महात्मा फुले जयंती साजरी

Amit Kulkarni