Tarun Bharat

अज्ञात वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

चिपळूण

  गुहागर मार्गावरुन दुचाकीने जाणाऱया तरुणास तालुक्यातील मालघर येथे अज्ञात वाहनाची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  योगेश अरुण वावरे (39, सध्या खेंड मुळ-अकोला) असे मृताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद कृपेश बजरंग आवाढे (23, चिपळूण पोलीस स्थानक) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वावरे हे आपल्या ताब्यातील होंडा ड्रीम युगा या दुचाकीने आबलोलीहून चिपळूणकडे गुरूवारी येत होते. ते तालुक्यातील मालघर-वाजेवाडीजवळ आले असता त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे वावरे यांच्या डोक्याच्या उजव्या डोळय़ाजवळ तसेच डाव्या हातास गंभीर दुखापत झाल्याने यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पडय़ाळ करीत आहेत.

Related Stories

दापोलीतील कुंभवे येथे साखरपुड्याच्या गाडीला अपघात

Archana Banage

Ratnagiri : व्यवस्थापकाने लावला हॉटेल मालकाला ५ .८७ लाखाला चूना

Abhijeet Khandekar

रत्नागिरी जिल्ह्यात नवीन 12 पॉझिटिव्ह

Archana Banage

राजापूर शहराला पुन्हा पुराचा वेढा

Patil_p

टॉवरच्या भाडय़ासाठी दूरसंचारकडे नाही पैसा

NIKHIL_N

वेंगुर्लेतील पोटनिवडणुकित एकनाथ राऊळ, गणपत सावंत आणि रघुनाथ खानोलकर विजयी

Anuja Kudatarkar