Tarun Bharat

अटी व नियांसह होणार विमानप्रवास

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील दोन महिन्यांपासून बंद असणारे बेळगावचे सांबरा विमानतळ वाहतूकीसाठी सोमवारपासून पुन्हा एकदा खुले होणार आहे. यासाठी विमातळ प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली आहे. परंतु प्रवाशांना अटी व नियमांचे पालन करूनच प्रवास करावा लागणार आहे. परराज्यातून येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक विलीगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

बेंगळूर, हैद्राबाद, अहमदाबाद व मुंबई या शहरांना विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंगही करण्यात येत आहे. विमानसेवा सुरू होण्यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत अनेक प्रक्रिया सुरू होत्या. राज्यांची परवानगी, प्रवाशांची दक्षता, जिल्हा प्रशासनाशी समन्वय अशा अनेक प्रक्रिया करण्यात येत होत्या. त्यामुळे विमानप्रवासाची सविस्तर माहिती रविवारीच उपलब्ध होणार आहे.

परराज्यातून येणाऱया प्रवाशांना संस्थात्मक विलिगीकरण

कर्नाटक सरकारच्या नव्या नियमावलीनुसार कोरोनाचा सर्वांधिक प्रार्दुभाव झालेल्या राज्यांमधून येणाऱया प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक तर 7 दिवस घरी विलीगीकरण करण्यात येणार आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांमधून येणाऱया प्रवाशांना ही नियमावली लागू असणार आहे. विमानाने प्रवास करून बेळगावमध्ये येणाऱया प्रवाशांना 7 दिवस संस्थात्मक तर 7 दिवस घरी विलीगीकरण करावे लागणार आहे.

Related Stories

मराठा बँकेच्या माजी संचालकांचे अपघाती निधन

Tousif Mujawar

महिला भजनी मंडळतर्फे स्वामीनगर मच्छे येथे गुरुपौर्णिमा

Patil_p

‘रेल टू एअर’ बसने सहाशे जणांचा प्रवास

Amit Kulkarni

अभाविपतर्फे उच्चशिक्षणमंत्र्यांची भेट

Patil_p

महिलांचा सन्मान करण्यासाठी पौष्टिक आहार मासाचरणाचे आयोजन

Amit Kulkarni

भवानी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत पंचमुखी स्पोर्ट्स विजेता

Amit Kulkarni
error: Content is protected !!