Tarun Bharat

अट्टल मोटारसायकल चोराला अटक

साडेतीन लाखाच्या 7 मोटारसायकली जप्त

प्रतिनिधी / बेळगाव

शहर व उपनगरांत मोटारसायकली चोरणाऱया एका अट्टल चोराला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

अनिस सलाम चौधरी (वय 34) रा. कसई गल्ली असे त्याचे नाव आहे. मार्केटचे प्रभारी एसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली माळमारुतीचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक व्हन्नाप्पा तळवार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए. बी. कुंडेद, एम. जे. कुरेर, के. डी. नदाफ, जे. एन. भोसले, बी. एम. कल्लाप्पनवर, एस. एम. गुडदईगोळ, एल. एम. मुशापुरे, मारुती मादार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

Related Stories

जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे : प्रा. मायाप्पा पाटील

Patil_p

कृष्णकांत उर्फ काका तेंडुलकर यांचा वाढदिवस साजरा

Amit Kulkarni

खानापूर येथे भाजप महिला मोर्चा मेळावा

Amit Kulkarni

चिकालगुड्ड येथे ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन

Amit Kulkarni

बियाणांच्या खरेदीवेळी काळजी घेणे गरजेचे

Amit Kulkarni

बेळगावच्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूलचा सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून गौरव

Omkar B