Tarun Bharat

अठरा वर्षांवरील सर्वानी लस घेण्याचे आवाहन

संचारबंदीत 30 ऑगस्टपर्यंत वाढ

प्रतिनिधी /पणजी

राज्यस्तरीय सचारबंदी सोमवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आली असून कॅसिनो, रिव्हर क्रूझ, स्पा – मसाज पार्लर यांच्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी वाढीव संचारबंदीचा  आदेश जारी केला आहे. नवीन आदेशात तसा फारसा कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दरम्यान 18 वर्षावरील सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन आदेशातून सरकारने केले आहे. बिगर सरकारी कर्मचारी वर्गाने कामाच्या वेळेत किंचित बदल करुन गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच कामाच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियम – अटी यांचे पालन करावे, असे आदेशातून सूचवण्यात आले आहे.

मार्गदर्शक तत्वांचे पालन कराव

कर्मचाऱयांना खोकला, थंडी, ताप अशी लक्षणे असतील तर त्यांनी कामास येऊ नये तसेच डॉक्टर्सना भेटून योग्य ते औषधोपचार करावेत. लिफ्ट, मजले, पायऱयांवर व इतर ठिकाणी येता – जाताना गर्दी करु नये, दिव्यांग व त्यांच्या पालकांनी घरातच राहून काम करावे, अशा सूचना आदेशातून देण्यात आल्या आहेत.

Related Stories

आर्थिक संकटातही बँकांकडून कर्जदारांची वसुलीसाठी छळवणुक

Patil_p

सोमवारी कोरोनाचा एक बळी, 112 नवे बाधित

Patil_p

साळावली धरणावर पर्यटकांसाठी प्रवेश

Amit Kulkarni

राज्यात कोरोनाची दहशत कायम

Patil_p

संजीवनीताई बोकील यांच्या अध्यक्षतेखाली 28 रोजी “ललित लेखन उपक्रम” ; कार्यक्रम गुगल मीटवर

Amit Kulkarni

काँग्रेस कार्यकारी समितीवरुन दिगंबर कामत यांना हटविले

Amit Kulkarni