Tarun Bharat

अडथळय़ांमुळे चोर्ला महामार्ग बनला धोकादायक

पावसाळय़ात कोसळलेली माती, झाडे अद्याप रस्त्यावरच : सरंक्षण कठडय़ाभावी ट्रक दरीत कोसळून अपघात

प्रतिनिधी /वाळपई

बेळगाव चोर्ला घाट रस्ता विविध कारणास्तव धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाजूने संरक्षक कठडे नसल्यामुळे सातत्याने वाहन अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. यामुळे या मार्गावरून प्रवास करणे धोक्मयाचे बनलेले आहे. त्याचबरोबर पावसाळय़ात कोसळलेली माती अद्याप रस्त्यावरून न हटविल्यामुळे रात्री-अपरात्री या प्रवास करताना प्रवासी वर्गाची तारांबळ उडत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापन यंत्रणेने या ठिकाणी गांभीर्याने लक्ष देऊन या रस्त्यावरील असलेली धोकादायक प्रक्रिया त्वरित दूर करावी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे. अन्यथा गंभीर अपघात घडण्याची शक्मयता आहे.

चोर्ला घाट रस्त्यामुळे गोवा-बेळगाव अंतर बरेच कमी झाले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावर वाहतुकीत वाढ झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा  अनेक ठिकाणी संरक्षण कठडय़ांचा आभव आहे. यामुळे रात्री-अपरात्री प्रवास करताना धोकादायक स्थिती असते. यामुळे आगामी काळात हा मार्ग आणखी धोकादायक बनण्याची शक्मयता आहे.

मंगळवारी रात्री बेळगाव भागातून गोव्याकडे येणारा 14 चाकी ट्रक दरीत कोसळून मोठा अपघात घडला. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. समोरून येणाऱया वाहनांना बाजू देताना हा प्रकार घडला. हा ट्रक रस्त्यावरून सुमारे वीस मीटर खाली पडले. यामुळे वाहनांची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली. सदर ट्रक बेळगाव भागातून गोव्याकडे येत होता त्यामध्ये औद्योगिक वसाहतीमधील एका फॅक्टरीचे सामान भरण्यात आले होते. ट्रकमधील सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त सामानाचे नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

पावसाळय़ात तयार झालेले अडथळे अद्यापही जैसे थे

पावसाळय़ामध्ये महामार्गावर अनेकवेळा दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे तात्पुरती व्यवस्था म्हणून रस्त्यावरील माती काढून बाजूला टाकण्यात आली होती. मात्र उर्वरित माती अजूनही रस्त्यावरच आहे. याचा वाहतुकीला अडथळा होत असून अपघाताला निमंत्रण ठरत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर माती पसरलेली आहे. तर अनेक ठिकाणी माती कोसळल्यामुळे रस्ता अरुंद झालेला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण सदर महामार्गावर वाढू लागलेले आहेत. महामार्ग व्यवस्थापनाने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

झाडामुळे धोक्मयाचे वाढते प्रमाण.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गोवा हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी पावसाळी मोसमात झाडे कोसळलेली आहेत. सदर झाडे त्वरित बाजूला करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही. अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर आडवी झालेली आहेत. रात्रीच्यावेळी काळोखात रस्त्याचा अंदाज येत नाही. यामुळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागते. ही झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशी मागणी प्रवासी तसेच वाहन चालकांतून होत आहे.

महामार्गावर सातत्याने पोलिसांचे पेट्रोलिंग आवश्यक

रात्री-अपरात्री अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवतात. यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. याच वाहतुकी अडथळा येऊन अपघाताचे प्रमाण या ठिकाणी वाढू लागले आहे. यामुळे पोलिस यंत्रणेने सातत्याने या महामार्गावर पेट्रोलिंग ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी वाहन धारकांमधून होत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या बाजूला उभी करण्यापासून पोलीस यंत्रणेने रोखावे, अशी मागणी प्रवासी वर्गाने केलेली आहे.

Related Stories

कोरोनामुळे चतुर्थीची उलाढाल झाली अल्प

Patil_p

दोघांना अटक, चोरीचा माल जप्त

Amit Kulkarni

काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार ही अफवाच

Amit Kulkarni

पैकुळ पुलाचे बांधकाम 15 जूनपर्यंत पूर्ण करा

Amit Kulkarni

मांदे येथे तपोभूमी दिनदर्शिकेचे प्रकाशन

Amit Kulkarni

पाचशे चौ.मी.भूखंडातील बांधकामास दिलासा

Amit Kulkarni
error: Content is protected !!