Tarun Bharat

अडीच कोटीचा फायदा, साडेसहा कोटींचा तोटा!

Advertisements

इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोची व्यथा

सनरायजर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत अलीकडेच खाते उघडू शकल्याने त्यांच्या गोटात खुशीची लहर उमटणे साहजिक आहे. हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय प्राप्त केला, त्यावेळी या संघातील इंग्लिश फलंदाज जॉनी बेअरस्टोने 48 चेंडूत 53 धावांची आतषबाजी केली. पण, हाच जॉनी बेअरस्टो आता वेगळय़ाच चिंतेत आहे. बेअरस्टोला 2020-21 च्या कसोटी करारातून वगळले गेले असून यामुळे त्याचे साडेसहा कोटी रुपयाचे उत्पन्न बुडणार आहे. आयपीएल प्रँचायझी हैदराबाद सनरायजर्सने त्याला करारबद्ध करण्यासाठी अडीच कोटी रुपये मोजले. पण, एकीकडे अडीच कोटी रुपये मिळत असताना दुसरीकडे, त्याला साडेसहा कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार आहे.

ईसीबीने दोनच दिवसांपूर्वी कसोटी संघातील मध्यवर्ती कराराची घोषणा केली, त्यावेळी बेअरस्टोला त्यातून वगळले गेल्याचे स्पष्ट झाले. अर्थात, याची कुणकूण प्रत्यक्ष घोषणेच्या दोन दिवस आधीच सर्वांना लागली होती. ईसीबीने बेअरस्टोऐवजी डॉमिनिक सिबलीला संधी दिली.

अलीकडेच विंडीज व पाकिस्तानविरुद्ध संपन्न झालेल्या शेवटच्या दोन कसोटी मालिकांमधून बेअरस्टोला विश्रांती देण्यात आली होती. इंग्लंडने बुधवारी 12 कसोटी करार, 12 मर्यादित षटकांचे करार आणि 4 इन्क्रीमेंट करार जाहीर केले असून त्यातील कसोटी करारातून बेअरस्टोला डच्चू देण्यात आला आहे. सध्या आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व करत असलेल्या अष्टपैलू टॉम करणला ईसीबीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी करारबद्ध केले आहे. टॉमचा भाऊ सॅम करण हा चेन्नईकडून आयपीएल खेळत असलेला खेळाडूही इंग्लंडच्या वनडे-टी-20 संघात समाविष्ट आहे.

जोस बटलर, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर व ख्रिस वोक्स या सध्या आयपीएल खेळत असलेल्या अन्य इंग्लिश खेळाडूंचा इसीबीच्या कसोटी व मर्यादित षटकांच्या दोन्ही क्रिकेट संघात समावेश आहे.

Related Stories

सनरायजर्स हैदराबादचा गुजरातला पराभवाचा धक्का

Patil_p

वर्ल्ड ऍथलेटिक्सच्या निर्णयाने भारतीय ऍथलेट्सची निराशा

Patil_p

ब्रिटनच्या अँडी मरेची पुरुष एकेरीतून माघार

Patil_p

पुजाराची लिस्ट ए मधील सर्वोच्च कामगिरी

Patil_p

राष्ट्रीय क्रिकेट हंगामाला आजपासून प्रारंभ

Patil_p

लक्ष्य सेन, श्रीकांत यांचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त

Patil_p
error: Content is protected !!