Tarun Bharat

अडीच वर्षानंतर लांजात महामार्ग चौपदरीकरणाला वेग

प्रतिनिधी / लांजा

अडीज वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या वाकेड ते लांजा चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली असून वाकेड ते लांजा रेस्ट हाऊस या चौपदरीकरणाचे काम नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर  डिसेंबरमध्ये लांजा बाजारपेठेत चौपदरीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. 

महामार्गाच्या वाकेड ते लांजा दरम्यान चौपदरीकरणसाठी चिंतामणी कंपनी साधन सामुग्रीसह लांजा येथे दाखल झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी कंपनीने कुवे ते लांजा रेस्ट हाऊस पर्यंत काम हाती घेतले आहे. दिवाळी सणात स्थानिक व्यापाऱयांना अडचण होऊ नये या दृष्टीने लांजा बाजारपेठेत कामाला सुरुवात करण्यात आली नव्हती. या कामाला डिसेंबर महिन्यात सुरुवात करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या लांजा शहरातील चौपदरीकरणाच्या कामाने गती घेतली आहे.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात आज 37 नवे रुग्ण तर तिघांचा मृत्यू तर

Archana Banage

चित्र रेखाटणारे हात राबू लागले शेतात!

Patil_p

‘जैतापूर’साठी 3 आंतरराष्ट्रीय कंपन्यांची हातमिळवणी

Patil_p

जिह्यात पुन्हा कोरोना विस्फोट

Patil_p

Ratnagiri : कोकण रेल्वे मार्गावर रोहा येथे 18 रोजी ‘ब्लॉक’

Abhijeet Khandekar

जिल्हा नियोजनच्या बैठकीत लोकप्रतिनिधींची अळीमीळी गुपचिळी

Patil_p
error: Content is protected !!