Tarun Bharat

अण्णाद्रमुकमध्ये पुनरागमनासाठी शशिकला न्यायालयात 15 मार्च रोजी होणार सुनावणी

Advertisements

वृत्तसंस्था / चेन्नई

अण्णाद्रमुकच्या बडतर्फ माजी प्रमुख व्ही.के. शशिकला तुरुंगातून बाहेर पडल्या आहेत. त्यांनी आता पक्षात स्वतःचे पद परत मिळविण्यासाठी न्यायालयाचे दार ठोठावले आहे. शशिकला यांनी चेन्नई न्यायालयात तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानिसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. राज्यात आगामी काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. अशा स्थितीत शशिकला यांच्या राज्यातील उपस्थितीमुळे राजकारणाचा पारा वाढत आहे.

शशिकला यांनी यापूर्वी 2017 मध्ये अण्णाद्रमुकच्या एका सर्वसाधारण सभेसंबंधी याचिका दाखल केली होती. या सभेचे आयोजन ईपीएस आणि ओपीएस यांनी शशिकला यांना महासचिव पदावरून हटविण्यासाठी केले होते. नव्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी शशिकला यांनी केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी 15 मार्च रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

राज्याच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जे. जयललिता यांच्या घनिष्ठ सहकारी राहिलेल्या शशिकला पक्षाच्या प्रमुख म्हणून समोर आल्या होत्या. राज्यात मुख्यमंत्री होण्यापूर्वीच शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे 4 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागला आहे.

Related Stories

पीएसीच्या तंबूत घुसला ट्रक; 2 जवानांना वीरमरण

datta jadhav

मेडिकल स्टोअर्समध्ये लवकरच लस उपलब्ध

Patil_p

मुजफ्फरनगर दंगलींचा विसर पडला का?

Patil_p

आप नेत्याकडून अपशब्द, पंतप्रधानांकडून टीकास्त्र

Patil_p

‘मी ब्राम्हण, मला हिंदुत्व शिकवू नका’

Patil_p

चौथ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

Amit Kulkarni
error: Content is protected !!