Tarun Bharat

अतिरिक्त जिल्हाधिकाऱयांकडून जम्बो कोव्हिड सेंटरच्या कामाचा आढावा

Advertisements

वार्ताहर/ कराड

  अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बुधवारी यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे सुरू असलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना शिंदे यांनी दिल्या.

    कृष्णा साखर कारखाना निवडणुकीचे निरीक्षक व अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी बुधवारी कराड तालुक्यातील नारायणवाडी, वाठार, कार्वे, रेठरे बुद्रुक व सांगली जिल्हय़ातील निवडणूक केंद्रांना भेटी दिल्या. यानंतर त्यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे जम्बो कोव्हिड सेंटरला भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी प्रांत उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मंडलाधिकारी महेश पाटील, तलाठी संजय जंगम व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

   कोरोनाच्या तिसऱया लाटेचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल येथे सुमारे 100 बेडचे जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तर उपजिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोव्हिड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. जम्बो कोव्हिड सेंटरच्या कामाची पाहणी करून शिंदे यांनी आढावा घेतला व सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.  

Related Stories

फिफ्टी फिफ्टी चलो गुवाहटी, विधिमंडळात विरोधकांचे बिस्किट पुडे चर्चेत

Abhijeet Khandekar

आर्थिक वादातून पुलाची शिरोलीत युवकाचा खून

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

Abhijeet Shinde

उक्कडगाव येथे वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

Patil_p

सातारा : महादरे तळ्यात उडी घेऊन एकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

अनिल देशमुख सीबीआय चौकशीसाठी दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!