Tarun Bharat

अतिरिक्त हरकत दाखल करण्यासाठी मागितली परवानगी

वॉर्ड पुनर्रचना-आरक्षणप्रकरणी न्यायालयाकडे विनंती

प्रतिनिधी / बेळगाव

महापालिका वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणप्रकरणी अतिरिक्त हरकत दाखल करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयाकडे केली. त्यामुळे हरकत दाखल करण्यासाठी न्यायालयाने मुभा दिली. तसेच सुटीच्या कालावधीत निवडणूक घेण्याच्या हालचाली झाल्यास सुटीमध्ये सुरू असणाऱया विशेष न्यायालयात दाद मागण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. पण आता पुढील सुनावणी जूनच्या पहिल्या आठवडय़ात होणार आहे.

महापालिका वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवून केवळ आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे याबाबत धारवाड उच्च न्यायायलात धाव घेवून माजी नगरसेवकांनी फेरविचार याचिका दाखल केली होती. ही सुनावणी दि. 22 रोजी होणार होती. पण सरकारी वकिलांनी वेळ घेतल्याने सुनावणी झाली. मात्र शुक्रवारी ही सुनावणी झाली. सध्या कोरोनाचा प्रसार वाढला असून या परिस्थितीत निवडणूक घेणे अशक्मय असल्याची माहिती देण्यात आली. तसेच अतिरिक्त हरकत दाखल करणार असून परवानगी देण्याची विनंती यावेळी राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. त्यामुळे हरकत दाखल करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाला उन्हाळी सुटी असल्याने या कालावधीत निवडणूक घेण्यासाठी घोषणा होण्याची शक्मयता असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सुटीच्या कालावधीत निवडणुकीच्या हालचाली आढळून आल्यास सुटीमध्ये चालविण्यात येणाऱया विशेष न्यायालयात दाद मागण्याची मुभा असल्याचे धारवाड उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले. तसेच पुढील सुनावणी जूनच्या पहिल्या आठवडय़ात होईल, असे सांगितले. त्यामुळे आता वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षणाची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर पडली आहे.

Related Stories

केएलईच्या एमबीए विभागातर्फे मार्गदर्शनपर कार्यक्रम

Amit Kulkarni

केंद्र-राज्यातील भाजप सरकार पायउतार होईल

Amit Kulkarni

एमएलआयआरसीमधून प्रशिक्षणार्थी जवान बेपत्ता

Tousif Mujawar

आश्रय योजनेतील घरखर्चात दीड लाखाची वाढ

Omkar B

सेलडीडविषयी आज बेळगाव येथे सुनावणी

Patil_p

गोवा-बेळगाव महामार्ग कामाबद्दल सुप्रीम कोर्टातून पुन्हा 29 ऑक्टोबर तारीख

Patil_p