Tarun Bharat

अतिवृष्टीने होणारे भूस्सखलन,पन्हाळ्यास पर्यायी रस्ता,जनावर छावणी उभी करा

मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत केली मागणी

वारणानगर / प्रतिनिधी

अतिवृष्टीने होणारे भूस्सखलन, पन्हाळ्यास पर्यायी रस्ता,पूरपरस्थितीत जनावरांची छावणी उभी करा अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजीत केलेल्या मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे यानी केली.

अतिवृष्टीने पन्हाळगडावर जाणारा रस्ता व गडाच्या पायथ्याच्या बाजूने असणाऱ्या गांवात भूस्सलंखन झाले होते. भूस्सखलन होणाऱ्या भागाचे सर्वेक्षण करून तेथील रहिवाशांचे स्थलांतर करावे, अतिवृष्टीने रस्ता खचला म्हणून पन्हाळगडावर जाणारा एकमेव असणारा मार्ग काही महिने बंद होता त्यासाठी पर्यायी रस्ता निर्माण करावा अशी मागणीही मोरे यानी केली.

नदीकाठच्या गावात पूर आलेवर नागरिकांचे स्थलातंर केले जाते तथापी अनेक नदी काठच्या गावात असणाऱ्या जनावरांचे स्थलातंर केले जात नाही त्यामुळे जनावरे सोडून येण्यास नागरिक देखील स्थलातंर करण्यास विरोध करतात गतवर्षी पूराच्या पाण्यात अडकून अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. त्यामुळे पूरपरस्थितीत ज्या गावातील लोक स्थलांतर केली. जातात तेथील जनावरांना स्थलातंरीत करण्यासाठी छावण्या उभ्या कराव्यात तसेच ओढे, नाले, नदी यावरील पूलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून कोणत्या प्रकारच्या वहातूकीला पूल योग्य आहे किंवा कोणत्या कारणासाठी धोकादायक आहे याची माहिती देणारे फलक पूलाजवळ लावण्यात यावेत अशी मागणी मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई याच्याकडे जिल्हा परिषद सदस्य शिवाजी मोरे यानी केली आहे.

Related Stories

कोल्हापूर : खोकुर्ले येथील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला

Archana Banage

मराठा-कुणबी विद्यार्थ्यांचे ‘जंतरमंतर’वर आंदोलन

tarunbharat

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात महापुरची धास्ती; ३० हजारांहून अधिक लोक स्थलांतरित

Archana Banage

मंत्री मुश्रीफांचा सोमय्यावर 100 कोटीचा दावा

Archana Banage

कोल्हापूर : मसुद मालेत आजवर एकही कोरोनाबाधित नाही

Archana Banage

सीमावासीयांवर अन्याय करणार्या कर्नाटक सरकारचा निषेध: शिवसेनेतर्फे मिरजकर तिकटी येथे निदर्शने

Archana Banage