Tarun Bharat

अतिवृष्टीमुळे गुरांचा गोठा कोसळून वृद्धाचा मृत्यू

चिपळूण-कादवड येथील घटना, दोन बालिका जखमी

चिपळूण

काही दिवसांपासून कोसळणाया धुव्वाँधार पावसामुळे तालुक्यातील कादवड-कातकरवाडी येथे गुरांचा गोठा कोसळून वृध्दाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. यावेळी त्यांच्या दोन नातीदेखील जखमी झाल्या आहेत.

बबन लक्ष्मण निकम (68) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे, तसेच माधुरी गणेश पवार (7), आरती संजय पवार (17) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. बबन निकम यांच्या गुराचा गोठा घरापासून काही अंतरावर आहे. शनिवारी सकाळी त्यांनी गुरे चरण्यासाठी बाहेर सोडली होती. त्यातच धुव्वाँधार पावसाने सुरुवात केली असता निकम हे माधुरी तसेच आरती यांना सोबत घेऊन गुरे बांधण्यासाठी तसेच चारा टाकण्यासाठी गोठय़ाकडे गेले होते. यावेळी हे तिघेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत असतानाच हा गोठा कोसळला. त्यात जखमी झालेल्या निकम यांचा मृत्यू झाला. तसेच माधुरी व आरती या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपसरंपच महेश जाधव, मंडळ अधिकारी एस. आर. आयरे, तलाठी एस. पी. नंदगळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. या पावसामुळे तालुक्यातील कासारवाडी येथील सीताराम घाणेकर यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

Related Stories

उत्तर रत्नागिरी भाजप महिला मोर्चाच्या वतीने निवेदन

Archana Banage

जुगार खेळताना अकराजण ताब्यात

NIKHIL_N

92 वर्षाच्या आजींची कोरोनावर मात

Patil_p

गोव्याच्या राज्यपालांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Abhijeet Khandekar

रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू

Anuja Kudatarkar

ऐश्वर्य मांजरेकर यांची दिल्ली फोरमच्या युथ फॉर कोस्ट प्रशिक्षणासाठी निवड

Anuja Kudatarkar