Tarun Bharat

अतिवृष्टीमुळे माशेलात भातशेतीवर परिणाम

वार्ताहर/ माशेल

माशेल परीसरात मुसळधार पावसामुळे शेतकऱयांना भातशेती पाण्यात पडल्याने भातपीक वाचविण्यासाठी तारांबाळ उडाली आहे. माशेल, माडापै, खांडोळा, तिवरे भागातील गेल्या काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निम्याहून अधिक शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील बनले आहे.

कष्टे खाजन माडापै येथील ग्रामिण भागात भातशेती हा उदारनिर्वाहाचा प्रमुख साधन आहे. अवकाळी पावसाने कापणीच्या उंबरठय़ावर असलेले भातपीकाचे मान टाकली असून सर्वत्र आडवे पडलेले शेती पाहायला मिळत आहे. यावेळी एका शेतकऱय़ांने आपली व्यथा मांडली पावसाळा सुरू झाल्यानंतर मोठया कष्टाने व पदरात असलेल्या पैशाची पदरमोड करीत भातशेती, पेरणी केली होती. चांगले पिक मिळावे म्हणून खताचाही वापर केला होता. परंतू अचानक कोसळलेल्या पावसामुळे निम्याहून अधिक शेतीने मान टाकली असून यंदा भातावर गुजराणा करण्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

अशा बिकट परिस्थितीत सरकारने मदत करावी असे आवाहन शेतकऱयांनी केले आहे. तसेच स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी मदतीसाठी सरकारदरबारी प्रयत्न करावे अशी विनंती केली आहे. 

Related Stories

अठरा वर्षांवरील सर्वानी लस घेण्याचे आवाहन

Amit Kulkarni

कला अकादमी वास्तूची वैभवसंपन्नता टिकवावी

Patil_p

स्थानिक कामगारांना डावलून खनिज खाणी नकोच !

Amit Kulkarni

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांचे पेडणे येथे मुरगावचे नगरसेवक विनोद किनळेकर यांच्या घरी गणपती दर्शन

Omkar B

सत्तरीत वादळी वाऱयासह पावसाचा तडाखा

Amit Kulkarni

फोंडा तालुक्याला वादळी वाऱयाचा तडाखा

Amit Kulkarni