Tarun Bharat

अती मद्य प्राशन करून दिल्लीतील बडय़ा धेंडांच्या सुपुत्राचा मोरजी पार्टीत धांगण धिंगाणा

प्रतिनिधी/ म्हापसा

मोरजीतील एका नामांकित क्लबमध्ये संगीत पार्टीत अती मद्य प्राशन करून धांगण धिंगाणा घालून झालेल्या भांडणात दिल्लीतील चौघां पर्यटकांना त्या पार्टीमध्ये येथेच्छ चोप देण्यात आला. आपला बचाव करण्यासाठी तेथून पळ काढणाऱया पर्यटकांनी आपला पाठलाग करीत असल्याचे समजल्यावर शिवोली येथील घनदाट जंगलात अती वेगामुळे अपघात झाल्याने अखेर आपली कार तेथेच सोडून घटदाट जंगलात पळ काढला व त्या चौघांनी शुक्रवारी रात्र त्या जंगलात काढली. दरम्यान हे चौघेही इसम दिल्लीतील बडय़ा धेंडय़ांचे सुपुत्र असल्याची माहिती चौकशीअंती उघड झाली असून त्यांना यातून सोडविण्यासाठी केंद्रातून काही राजकीय नेत्यांचे फोनही पोलीस स्थानकात घणघणले असल्याची माहिती हाती आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरज गांवस तसेच उपनिरीक्षक अमिर तरल आणि पोलीस पथकाने तात्काळ शिवोलीत धाव घेत सोनारखेड येथील जंगल परिसर पिंजून काढला. मात्र ते चौघे आढळून आले नाही मात्र दुपारी 2 वजेपर्यंत चौघांही तरुणांना बेधुंद झोपलेल्या अवस्थेत असताना जंगलातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर शिवोलीच्या आरोग्य केंद्रावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यावेळी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना तसेच वरिष्ठ अधिकारी वर्गांनी येथे धाव घेऊन पाहणी केली. दरम्यान चार दिवसापूर्वी गोव्यात उतरलेल्या तसेच कांदोळीतील एका खासगी हॉटेलात उतरलेले दिल्लीस्थित बडय़ा धेंडांचे सुपुत्र शुक्रवारी रात्री मोरजीतील पार्टीत धांगण धिंगाणा घातल्याने पार्टी अर्ध्यावरच सोडून सुसाट वेगाने कांदोळीत परतत असताना कुणीतरी आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी कारगाडीच्या चालकाने गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांनी रस्त्याच्या उडव्या बाजूकडील वीज खांबाला जोरदार धडक दिली व मागाहून पाठलाग करणाऱया हल्लेखोरांच्या तावडीतून सुटण्यासाठी गाडी तेथेच टाकून जवळच्या जंगलात धाव घेतली. सकाळी पोलिसांनी त्यांचा शोध घेत जंगल परिसर पिंजून टाकला असता चौघेही बेधुंद अवस्थेत जंगलात वेगवेगळय़ा ठिकाणी पोलिसांना सापडले.

Related Stories

दावकोण पूरग्रस्त भागात द. गोवा जिल्हाधिकाऱयाची पाहणी

Patil_p

रक्तदान हे श्रेष्ट दान, सर्वांनी रक्तदान करावे

Amit Kulkarni

वेर्णा महामार्गावरील अपघातात कारचालक महिला जागीच ठार

Patil_p

फातोडर्य़ात आज एटीकेएमबीची लढत केरळ ब्लास्टर्सशी

Patil_p

नावेली अपघातात 1 ठार, चालकाला अटक

Omkar B

वेतन थकबाकीच्या प्रश्नावर एमपीटीच्या कामगार संघटनेकडून केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना निवेदन सादर

Omkar B