Tarun Bharat

अत्यावश्यक विभागातील नोकरभरतीत मागासवर्गीय अनुशेष भरून काढा

Advertisements


काष्ट्राईब कर्मचारी महासंघाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागण

सोन्याळ/प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून ४ मे २०२० रोजी राज्याच्या वित्त विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासकीय सेवेमधील नोकर भरतीवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. या शासन निर्णयाचे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने स्वागत आहे. परंतु वर्षानुवर्षे मागासवर्गीय नोकर भरती आणि पदोन्नती अनुशेष मोठ्या प्रमाणावर रिक्त आहे. भविष्य काळात आरोग्य विभागासह स्वच्छता आणि औषध निर्माण आदी अत्यावश्यक खात्यामध्ये जी नोकर भरती करण्यात येणार आहे त्यात प्रधान्याने शासनाच्या बिंदूनामावली प्रमाणे मागासवर्गीय रिक्त अनुशेष भरण्यात यावे अशी मागणी काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने मागासवर्गीय रिक्त अनुशेष भरण्याकरीता राज्याचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी सतत राज्याच्या विविध विभागामध्ये आढावा बैठक घेऊन आणि पाठपुराव्याने नोकरभरती प्रक्रिया व पदोन्नती करणे बाबत सतत प्रयत्न करीत आहेत. आताच्या घडीला महाराष्ट्रसह देशात आणि जगात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आणि लॉकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था नाजूक बनली आहे. त्यामुळे राज्याची उत्पादन क्षमता घटली की आर्थिक जमेचा ताळमेळ घालणे कठीण जाते.या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने नवीन नोकरभरती आणि बदली यावर बंदी घातली आहे. या निर्णयाचा काष्ट्राईब कर्मचारी महासंघाने स्वागत केले आहे. परंतू राज्यामध्ये गेले अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे मागासवर्गीयांची रिक्त असलेली अनुशेष पदे मोठ्या प्रमाणावर शिल्लक आहेत. वित्त विभागाने काढलेल्या ४ मे २०२०च्या आदेशानुसार अशा स्वरूपाची पदे भरताना राज्यातील सहाही विभागाच्या सहाय्यक आयुक्तकडून ( मागास कक्ष) यांचेकडून बिंदूनामावली तपासून सद्याच्या परिस्थितीत आरोग्य, स्वच्छता, अन्न व औषध निर्माणशास्त्र या सारख्या अत्यावश्यक विभागात जी पदे भरणेत येणार आहे, त्यात प्राधान्याने रिक्त अनुशेषची जागा भरण्यात यावेत म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या सर्व संवर्गाना न्याय मिळेल शिवाय सद्या मागासवर्गीय रिक्त पद भरती मधील अन्याय दूर होईल असे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, व सामाजिक न्यायमंत्री, धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे. अशी माहिती महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांनी दिली.

यावेळी वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी, पुणे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब व्हनखंडे, सांगली जिल्हा सचिव बाबासाहेब माने, कार्याध्यक्ष विजयकुमार सोनवणे, काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, शिक्षक संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष लखन होनमोरे आदी उपस्थित होते.

Related Stories

सांगली : काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

Archana Banage

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार

datta jadhav

‘मला तेवढाच उद्योग नाही’; पार्थच्या ‘त्या’ ट्विटवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Tousif Mujawar

साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा

Archana Banage

”भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं आंतरराष्ट्रीय षडयंत्र”

Archana Banage

भाजपच्या नाच्यांनी त्यांना तरी अपशकून करू नये : शिवसेना

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!