Tarun Bharat

अत्यावश्यक सेवांसाठी प्रयत्नशील

Advertisements

मुख्यमंत्र्यानी घेतला नुकसानीचा आढावा

प्रतिनिधी / पणजी

अत्यावश्यक सेवा सुरळीत करण्यासाठी प्रधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. वीज, पाणी आणि रस्ते आज मंगळवार संध्याकाळपर्यंत सुरळीत केले जातील. संबंधीत खात्यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावर पडलेली झाडे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असून जवळजवळ काम पूर्ण होत आले आहे. चक्रीवादळामुळे ज्यांची कमीप्रमाणात नुकसानी झाली आहे त्यांना आपत्कालीन व्यवस्थापन फंडातून नुकसान भरपाई देण्यात येईल. ज्यांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागले त्यांना केंद्रातून मिळणाऱया निधीतून नुकसान भरपाई देण्यात येईल, असे ते म्हणाले.

राज्यात तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीत विविध खात्याचे मंत्री, खात्यांचे प्रमुख अधिकारी तसेच दोन्ही जिल्हाधिकारी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी पत्रकारांना वरील माहिती दिली.

केंद्रातून विशेष निधी येणार

मुख्यमंत्री म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोनवरून गोव्याच्या परिस्थितीबाबत माहिती घेतली आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या समस्यावर कसा तोडगा काढता येईल याबाबतही गृहमंत्र्यानी विचारणा केली आहे. नुकसानीला सामोरे जाण्यासाठी केंद्रातून राज्याला विशेष निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 शेतकऱयांची मोठय़ाप्रमाणात नुकसानी

शनिवारी रात्री रविवारी सकाळपासूनच झालेल्या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसासह राज्याला जबरदस्त तडाखा बसला आहे. कोटय़ावधीची हानी झाली आहे. अनेक घरावंर, वाहनावर, झाडे कोसळल्याने लोकांचे नुसकसान झाले आहे.  शेतीबागातीतील केळी, माड तसेच पीक देणारी इतर झाडांची मोठय़ाप्रमाणात पडझड झाल्याने शेतऱयांनाही मोठे नुकसान झाले आहे. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे अनेक घरांचे दुकानांचे पत्रे उडाले तसेच विज खांब कोसळ्याने शहरातील व ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. अनेक गावात काळोखाचे साम्रज्ज पसरले आहे. गावागावातून विज गायब झाल्याने लोकांचे हाल होत आहेत.

जनतने सहकार्य करावे, राजकारण्यांनी राजकारण करु नये

काही ठिकाणी वीज सुरळीत झाली आहे. काही ठिकाणी अद्याप काम बाकी असल्याने आज मंगळवारी संध्याकाळपर्यंत वीज सुरळीत होईल. लोकांनी विनाकारण पाण्यासाठी किंवा विजेसाठी संबंधीत खात्यांच्या कार्यालयांवर मोर्चे नेऊ नयेत. काही राजकारणी अशा संधींचा फायदा घेण्यासाठी वाटच पाहत असतात. मात्र त्यांनीही परिस्थिती समजून घ्यावी. विनाकारण राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये. सुमारे 700 हून अधिक विजेचे खांब पडले आहेत. काही मोडले आहेत तर 15 हून अधिक ट्रान्सफॉर्मर मोडलेले आहेत. या सर्व गोष्टी जागेवर घालण्यासाठी थोडा वेळ लागणार याचाही विचार करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

वीज, पाणी या गोष्टी अत्यावश्यक आहेत याची जाणीव सरकारला आहे. ते सुरळीत करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. लोकांनी सहकार्य करावे. काही ठिकाणी रस्त्यावरील झाडे काढण्यासाठी लोकांनी सहकार्य केले आहे. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱयांनी स्थानिक प्रतिनिधींना नुकसानीची माहिती द्यावी

राज्यातील शेतकऱयांना मोठय़ाप्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. सरकार योग्यती नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकऱयांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना नुकसानीची माहिती द्यावी, योग्य सोपस्कर पूर्ण केल्यानंतर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

Related Stories

पाणी बिलांसाठीच्या एकरकमी योजनेला मुदतवाढ

Amit Kulkarni

केंद्राकडून गोव्यात 22 हजार कोटींची विकासकामे

Amit Kulkarni

गोव्याच्या मासिक जीएसटी संकलनात 43 टक्के वाढ

Amit Kulkarni

मडगाव स्कूल कॉम्प्लेक्सला शासनाचा उत्कृष्ट पतसंस्थेचा पुरस्कार

Amit Kulkarni

मुरगावात पालिका निवडणुकीसाठी ईच्छुक उमेदवारांची जय्यत तयारी, राखीवतेमुळे सुप्त भिती आणि चिंताही, मात्र, काहींचा उघडपणे प्रचार

Amit Kulkarni

मराठी अकादमीतर्फे आज फोंडय़ात विद्यार्थ्यांचा गौरव

Amit Kulkarni
error: Content is protected !!