Tarun Bharat

अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील : जिल्हाधिकारी शेखर सिंह

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील अत्यावश्यक बाबी वगळता सर्व प्रकारची दुकाने व आस्थापने पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. तर अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार कोरोना प्रादुर्भावानंतर अत्यावश्यक सेवेची चालू ठेवलेली सर्व दुकाने उदा. किराणा सामान, दुध, औषध दुकाने, कृषि सेवा केंद्रे व अन्य जीवनावश्यक वस्तूंची दिनांक 11 एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत रोज सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत, व सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंतच चालू राहतील. तथापि भाजीपाला विक्री केंद्रे फक्त सकाळी 8 ते 11 या वळेतच चालू राहतील. भाजीपाला केंद्रे संध्याकाळी चालू राहणार नाहीत.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द नियमानुसार कडक कारवाई करण्यात येऊन संबंधितांचा परवाना तात्काळ कायमस्वरुपी रद्द करण्यात येवून साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार, दंड प्रक्रीया संहिताचे कलम 144, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या आदेशाचे उल्ल्ंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. तसेच संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद आहे.

Related Stories

पावसाळयाच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या स्ट्रीट लाईटच्या दुरुस्तीच्या कामांना वेग

Patil_p

शहर पोलिसांनी दोन लाखाचा गुटखा पकडला

Patil_p

फडणवीस 10 तासानंतर मुंबईत परतले, हालचालींना वेग

datta jadhav

सातारा : नैसर्गिक आपत्तीत हरणाई सुतगिरणीचे कार्य आदर्शवत : गृहराज्यमंत्री

Abhijeet Shinde

सांगली : संशयित खुनी आरोपी २४ तासात जेरबंद

Abhijeet Shinde

कोरोनात गुलाबी थंडीची चाहूल

Patil_p
error: Content is protected !!