Tarun Bharat

अथणीत सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू

वार्ताहर/ अथणी

अथणी येथे सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालय (एआरटीओ) सुरू झाल्याने, या परिसरातील जनतेची अनेक वर्षांपासून करण्यात येणारी मागणी पूर्ण झाली आहे. अथणी, कागवाड, रायबाग व कुडची मतदारसंघात येणाऱया गावातील नागरिकांना या कार्यालयाचा लाभ मिळणार आहे. या परिसरातील वाहनांची आता के. ए. 71 या क्रमांकाने नोंद होणार असल्याची माहिती, परिवहन तथा उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.

अथणी-हारुगेरी मार्गावर नूतन सहाय्यक प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री श्रीमंत पाटील, आमदार महेश कुमठहळ्ळी, आमदार पी. राजीव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री सवदी म्हणाले, अथणी येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी 20 एकर जागेची निवड करण्यात आली आहे. ही इमारत होईपर्यंत भाडेतत्वावर सदर इमारतीमध्ये कार्यालय सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी या परिसरातील नागरिकांना आपले वाहन पासिंग करून घेण्यासाठी चिकोडीला जावे लागत होते. यामुळे वेळ व पैसा या दोन्हींचा अपव्यय होत होता. त्यामुळे जनतेच्या सोयीसाठी अथणी येथेच सदर कार्यालयासाठी मंजुरी मिळवली असल्याचे सांगितले.

तसेच अथणी शहरात चालक प्रशिक्षण वर्ग सुरू करणार आहे. सरकारच्यावतीने एस. सी., एस. टी. प्रवर्गातील मुलांना मोफत चालक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी नूतन वसतीगृहदेखील बांधण्यात येणार आहे. चिकोडी येथील परिवहन कार्यालयाने गेल्या वर्षी 62 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. मात्र यावर्षी केवळ 35 टक्केच उद्दिष्टपूर्ती झाली आहे. त्यामुळे परिवहन खात्यास अधिक उत्पन्न कसे मिळेल यासाठी लक्ष देण्यात येत आहे. शिवाय यापूर्वी ऊसतोडणी यंत्रासाठी 6 लाख रुपयांचा कर आकारण्यात येत होता. तो आता 3 लाखांवर आणला असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी चिदानंद सवदी, एस. ए. मुदकानावर, आर. एम. पाटील, महादेव कोरे, विनायक बागडी आदी उपस्थित होते.

Related Stories

चेंबर निवडणूक विकास पॅनेलने जिंकली

Patil_p

हिडकल येथील रेकॉर्डरुम बेळगावला हलवावे

Omkar B

खुल्या फ्यूज पेटय़ा ठरताहेत जीवघेण्या

Amit Kulkarni

अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

Amit Kulkarni

चिकोडी प्रभुवाडीत कारच्या धडकेत बालक ठार

Patil_p

अल्फीया महोत्सव सांस्कृतिक स्पर्धेत डीपी स्कूलला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni