Tarun Bharat

अदर पूनावाला भारतात परतले

मुंबई/प्रतिनिधी

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला लंडनहून भारतात परतले आहेत. पुण्यामध्ये खासगी विमानाने अदर पूनावाला पुण्यात दाखल झाले. जवळपास गेल्या महिन्याभरापासून जास्त काळ परदेशात होते. लसीवरून अदर पूनावाला यांनी सतत धमक्या मिळत असल्याचा आरोप केल्याने खळबळ माजली होती. यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान आता ते पुण्यात परतले आहेत.

भारतात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु असताना दुसरीकडे सिरमच्या कोव्हिशिल्ड लसीला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दरम्यान, देशात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने गोंधळाचं वातावरण असताना यादरम्यानच मे महिन्यात अदर पूनावाला लंडनला निघून गेले होते. अदर पूनावाला यांनी आपण उद्योगाच्या निमित्ताने लंडनला जात असून तेथील काम संपल्यानंतर भारतात परतणार असल्याचं सांगितलं होतं. अदर पूनावाला सिरम लंडनमध्येही आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे.

Related Stories

निर्माते-दिग्दर्शकांवर एनसीबीची छापेमार

Patil_p

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते ई-फेरफार सातबाऱ्याचे वाटप

Tousif Mujawar

रजनीकांत यांनी पुरस्कार अर्पण केलेले राज बहादूर आहेत तरी कोण?

Archana Banage

कोल्हापूर : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनकडून राज्यमंत्री यड्रावकरांचा सन्मान

Archana Banage

बलात्कार पिडितेला न्याय द्या…

Patil_p

कर्नाटक विधानसभा निवडणूक : भाजप 65 जागांचा आकडा ओलांडू शकणार नाही- डीके शिवकुमार

Abhijeet Khandekar