Tarun Bharat

अधिवेशनात कोरोनावरच चर्चा व्हावी : दिगंबर कामत

प्रतिनिधी / मडगाव

गोव्यातील प्रत्येक नागरिक हा आपलाच नातलग आहे. कोरोनाचा प्रत्येक रूग्ण हे आपलेच आई-वडिल आहेत. संसर्ग झालेले प्रत्येक मुल हे आपलेच आहे ही भावना ठेऊन आज सोमवारी होत असलेल्या एक दिवशीय अधिवेशनात सर्व कामकाज बाजूला ठेऊन, केवळ कोरोना संकटावर व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करणे हे सर्व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असल्याचे आपण मनतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोनापेक्षा इतर विषय व कामकाज महत्वाचे आहे का हे स्पष्ट करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

कोरोना हाताळणीत गोव्यातील भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. लोकांना ‘काय भिवपाचे ना’ असा सल्ला देणारे सरकारच आज कोरोना संकटावर विधानसभेत चर्चा करण्यास घाबरत आहे असा दावा कामत यांनी केला आहे. कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत आहे. 14 वर्षाच्या विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूने आपल्याला धक्काच बसला आहे. सरकारने ताबडतोब कोरोना हाताळणीत संवेदनशीलता न दाखवल्यास, गोमंतकीयांना गंभीर संकटात भाजप सरकार ढकलणार आहे हे सरकारने ध्यानात ठेवावे असे कामत यांनी म्हटले आहे.

खासगी हॉस्पिटलातील 20 टक्के खाटा आरक्षण रद्द करा

कोविड हॉस्पिटलात केवळ 50 टक्के खाटा भरलेल्या असल्याचा दावा करून, उत्तर गोव्यात कोविड हॉस्पिटलाची गरज नाही असे आरोग्य सचिवांनी म्हटले आहे. तसे असल्यास गोवा सरकार खासगी हॉस्पिटलातील अतिदक्षता विभागात 20 टक्के खाटा कोविड रूग्णांसाठी आरक्षित करून ठेवण्याचा आदेश का रद्द करीत नाही असा प्रश्न करून दिगंबर कामत यांनी सदर आदेश त्वरित मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.

कोविड चाचणीच्या प्रतिक्षेत असलेल्या अहवालांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आत्ता सुमारे सात हजार चाचणी अहवाल प्रलंबित आहेत ही सरकारची अधिकृत आकडेवारीच सांगते. एकंदर परिस्थिती चिंताजनक आहे. गोवा विधानसभेच्या एक दिवशीय अधिवेशनात सरकारने केवळ कोरोना संकटाचा विषय चर्चेला घ्यावा ही तमाम गोमंतकीयांची मागणी असून सरकार लोकभावनांचा आदर करणार नसेल तर विरोधी आमदारांना वेगळा विचार करावा लागेल असा इशारा कामत यांनी दिला आहे.

Related Stories

दाबोळी विमानतळावर दहा लाखांचे सोने जप्त

Amit Kulkarni

दहावीच्या परीक्षेसाठी विरोधकांची सकारात्मक भूमिका हवी

Omkar B

मडगाव नगराध्यक्षपदी दामोदरांची निवड पक्की

Amit Kulkarni

स्मार्ट सिटी खाली रायबंदर येथे नविन आरोग्य केंद्र

Omkar B

फोंडा भाजपा मंडळातर्फे गरीब कल्य़ाण संमेलन

Amit Kulkarni

सुदेश भिंगी यांना इन्स्टीटय़ुट मिनेझिस ब्रागांझाचे सदस्यत्व

Amit Kulkarni