Tarun Bharat

अधोमुखवृक्षासन

Advertisements

या आसनामध्ये संपूर्ण शरीर हातांवर तोललं जातं. उलटे किंवा खाली तोंड केलेलं झाड दिसावं, तसं हे आसन दिसतं, म्हणून त्यास अंधोमुखवृक्षासन म्हणतात.

  • नृत्यनिपुण नर्तकी हातांवर चालण्याआधी या आसनाचा सराव करतात. यालाच हातांवर उभं राहणंही म्हणतात.
  • हे आसन करण्यासाठी जमिनीवर आसनावर ताठ उभं राहा आणि नंतर कंबरेमध्ये वाकून हात जमिनीवर टेकवा.
  • हाताचे पंजे थोडेसे शरीराच्या पुढे नेऊन शरीराचा आकार ‘अधोमुखश्वानासना’सारखा होतो.
  • डोके आणि तोंड पुढे नेऊन पाठ वरती आणून उंटासारखा आकार होईल. नंतर हळूहळू हातांवर शरीराचा भार टाका.
  • पाय गुडघ्यात दुमडून संपूर्ण शरीर हाताच्या पंज्यांवर पेला. पंज्यांमध्ये दोन खांद्यांएवढं अंतर हवं. पाय मात्र एकत्र जोडून ठेवावेत म्हणजे तोल साधता येतो. सरावाच्या वेळी बोटांमध्ये अंतर ठेवा. आसन 1 मिनिट स्थिर करावं. हळूहळू पाय गुडघ्यात दुमडून खाली घ्यावेत. उलगद जमिनीवर टेकवून पूर्वस्थितीत यावं.

आसनाचे फायदे

  • हात, खांदे, मनगटे, बोट मजबूत होतात. संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. डोक्यापर्यंत रक्तभिसरण चांगले होते. या आसनामुळं मेंदूला रक्तप्रवाह झाल्यानं तरतरीत वाटतं. शरीरातील ताकद वाढते. दृष्टी चांगली होते. चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.  याखेरीज या आसनाने एकाग्रता वाढते. मनःस्वास्था मिळते.
  • मनगटे, हातांची दुखापत असल्यास, रक्तदाब, हृदयविकार, व्हर्टिगो, डोक्याचं दुखणं असल्यास हे आसन करू नये.

Related Stories

कोरोना आणि लोहकण

Omkar B

जाणून घ्या: जमिनीवर बसून जेवणाचे जबरदस्त फायदे

Abhijeet Shinde

हायपर डायड्रेसिस म्हणजे काय

Amit Kulkarni

जाणून घ्या,बहुगुणी कोरफडीचे अनेक फायदे

Kalyani Amanagi

ट्रान्सफॅटचा धोका

Amit Kulkarni

वारंवार तोंडात अल्सर येताहेत? मग हे घरगुती उपाय करुन बघा

Rohan_P
error: Content is protected !!