Tarun Bharat

अध्यायन अध्यापन प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धती

प्रतिनिधी / पणजी

सर्वत्र पसरलेल्या कोवीड-19 च्या प्रसारामुळे देशभरात सध्यस्थितीत चालू असलेल्या टाळेबंदीमुळे संपूर्ण देशातील शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठांना आपले सर्व वार्षिक उपक्रम रद्द करावे लागले आहेत. गोवा विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकानुसार कोवीड-19 च्या प्रसारामुळे  16/03/2020 ते 31/03/2020 पर्यंत सर्व वर्ग रद्द करण्याची सूचना होती. गोवा विद्यापीठाचा परिपत्रकाला अनुसरून आग्नेल इंन्स्टिटय़ूट ऑफ टॅक्नोलॉजी ऑफ डिझाईन या महाविद्यालयाने टाळेबंदीची समस्या लक्षात घेता ऑनलाईन अध्ययन अध्यापन पद्धत निवडली. महाविद्यालयाने ज्या ऑनलाईन पद्धतीची निवड केली आहे त्यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे.

  1. पी. पी. टी आणि पी. डी. एफ द्वारे तयार केलेल्या साधनांना गुगल वर्गाद्वारे व्यासपीठ देणे.
  2. गुगल वर्ग व ईमेलच्या व्यासपीठाद्वारे घर बसल्या विकसित केलेल्या चलचित्र व्याख्याने, स्वाध्याक आणि प्रश्नमंजुषा यांचे श्रेणीकरण करणे.
  3. संपूर्ण अभ्यासक्रमाला अनुसरून तयार हिशोब, प्रश्नावली व संपूर्ण अंकविषयीची निरसन प्रक्रिया.
  4. एन. पी. टी. एल (आय आय टी) च्या साहित्याची पी. डी. एफ द्वारे चलचित्रे कोर्स.
  5. विद्यापीठाच्या व्यासपाठाद्वारे ईपुस्तके
  6. विद्यापीठातील वाचनालयाच्या कर्मचाऱयांच्या मदतीने ऑलाईन जर्नल वापरण्याची संधी.
  7. मागणीनुसार स्कॅन केलेल्या पाठय़ापुस्तकाच्या प्रती उपलब्ध
  8. महाविद्यालयातील संबंधित प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या समस्या इमेल हॉटसऍप आणि व्हिडीओद्वारे सोडवून मदत पुरविली.

सुविधांच्या अभावामुळे अविश्वसनीय इंटरनेट अनक्टीव्हीटी

आग्नेल इन्स्टिटय़ूट ऑफ टॅक्नोलोजी ऍण्ड डिझाईन हे उत्तर गोव्यातले एकमेव महाविद्याय असल्यामुळे येथे येणारे बरेचसे विद्यार्थी हे ग्रामीण विभागातून येतात.

बऱयाचशा विद्यार्थ्यांना नेटवर्क कनॅक्टीव्हिटीच्या विसंगतीची समस्या आढळते काही विद्यार्थ्यांना नेटवर्क मिळविण्यासाठी बाहेर येऊन एक विशिष्ट जागी उभे रहावे लागते.

अगदी कमी विद्यार्थ्यांकडे ब्रॉडबेंड इंटरनेट सेवा उपलब्ध आहे. ब्रॉडबॅण्ड कनॅक्टीव्हिटीची गती, वेग कमी असल्याने गोव्यातील ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांसाठी हा एक तोटा आहे. त्यामुळे त्याना भ्रमणध्वनीवरून उपलब्ध असलेल्या डॅटा योजनेवर अवलंबून रहावे लागते. ज्याची तूलना ब्रॉडबँड कनेक्शनकडे होऊ शकत नाही.

बऱयाच विद्यार्थ्यांनी अशी प्रतिक्रीया दिली की ऑनलाई वर्गाचे बरेच फायदे आहेत. पण ते विद्यार्थी वापरत असलेला डॅटा पॅक/योजना ही त्यासाठी अपूरी आहे. बरेचसे विद्यार्थी ब्रॉडहॅण्ड सेवा वपारत नसल्यामुळे त्याना या समस्येला सामोरे जावे लगते.

देशातील टाळेबंदी 3 मे पर्यंत विस्तारित केलेली असल्यामुळे वर्गामध्ये घेतल्या न जाणाऱया व्याख्यानांच्या नुकसान भरपाईसाठी महाविद्यालये व विद्यापीठे ही तंत्रज्ञानावर अवलंबून रहातील. विद्यार्थ्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने-ध्येयाने याचा वापर करण्यात येत असला तरी वास्तविक जगात विद्यार्थ्यांना  सुविधांच्या अभावामुळे अविश्वसनीय इंटरनेट कनेक्टीव्हिटीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या फक्त गोवा राज्यातील गावे तसेच शहरामध्ये नव्हे तर देशातील अने ठिकाणी आहे.

Related Stories

झुआरीनगरात अपघात, नवेवाडेतील युवक ठार

Omkar B

नाफ्ताच्या संकटातून गोव्याला मुक्त करण्यासाठी एमपीटीला बसला पंचवीस कोटींचा फटका

Patil_p

वादळी वारा, पावसामुळे वास्को परिसरात पडझड

Amit Kulkarni

फोंडा शहर लॉकडाऊनचा तुर्त विचार नाही !

Omkar B

अतुलनीय कारागिरीच्या ज्वेलरीचे पणजीत प्रदर्शन

Amit Kulkarni

अपघातग्रस्त 59 कुटुंबांना प्रत्येकी 2 लाखांची भरपाई वितरीत

Patil_p