Tarun Bharat

अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मूकाश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील वाघमा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांना यश आले. 

अनंतनागच्या वाघमा परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम हाती घेतली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. 

दरम्यान, सोमवारी अनंतनागमधील खुलचोहर भागात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले होते. 

Related Stories

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप; म्हणाले, “अजून एक फर्जीवाड़ा…”

Archana Banage

मध्यप्रदेशात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले

Patil_p

Video :अंध माऊलीच्या हातातला चिमुकला चालताना अचानक रेल्वे ट्रॅकवर पडला आणि तेवढ्यात रेल्वे आली, मग जे झाले….

Archana Banage

मुंबईतून उड्डाण केलेल्या अलायन्स एअरच्या इंजिनचे आवरण कोसळले

datta jadhav

मुख्यमंत्र्यांनी IPL Team साठी तयारी करावी; निलेश राणेंचा सल्ला

Kalyani Amanagi

लोकसभेसोबत विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात

datta jadhav