Tarun Bharat

अनंतनागमध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमधील श्रीगुफवारा शालगुल वनक्षेत्रात सुरू असलेल्या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. या परिसरात सध्या चकमक सुरू असून, सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान, चकमकीबाबत कोणत्याही अफवा पसरू नये, यासाठी अनंतनाग जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

श्रीगुफवारा शालगुल वनक्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहीम हाती घेण्यात आली. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

सुरक्षा दलांचे संयुक्त पथक ही कारवाई करत आहे. त्यामध्ये लष्कराच्या 3-आरआर (राष्ट्रीय रायफल्स) सीआरपीएफ आणि एसओजीचा समावेश आहे. 

Related Stories

पुतीन यांना मोठा धक्का ; वरिष्ठ अधिकाऱ्याने सोडला देश

Archana Banage

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही : उध्दव ठाकरे

Tousif Mujawar

Kolhapur : 10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात कलम 144 लागू

Archana Banage

रायगड-हरिहरेश्वरमध्ये संशयास्पद बोट; बोटीतून मोठा शस्त्रसाठा जप्त

Archana Banage

Kolhapur Breaking : कोल्हापूरातील ७ वारकऱ्यांचा भरधाव कारने चिरडल्याने मृत्यु

Kalyani Amanagi

रविवारी दिवसा कर्फ्यु नाही – राज्य सरकारचा निर्णय

Tousif Mujawar