Tarun Bharat

अनगोळ चौथे गेट ते बेम्को रस्त्यावर गतिरोधक बसवा

अपघात होण्याची शक्यता : लक्ष देण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ चौथे रेल्वेगेटपासून बेम्को नाक्मयापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी दुतर्फा पेव्हर्स घालून फुटपाथ बांधण्यात आले आहेत. या रस्त्यावर सायकलस्वारांना जाण्यासाठी सायकल ट्रकही करण्यात आला आहे. मात्र, या सर्व सुविधा कुचकामी ठरू लागल्या आहेत. याचबरोबर रस्त्याचे डांबरीकरण झाल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. त्यामुळे अपघात घडत असून तातडीने या रस्त्यावर गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

अनगोळ चौथे गेट ते बेम्कोपर्यंतचा रस्ता सतत रहदारी आणि गजबजलेला असतो. दोन्ही बाजूला चहाच्या टपऱया, हॉटेल्स, खानावळीसह इतर हॉटेल्स आहेत. त्यामुळे नेहमी गर्दी होत आहे. यातच हे वाहनचालक वेगाने वाहने चालवत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. पानाच्या टपऱयाही अधिक आहेत. याचबरोबर काही तरुण रस्त्यावरच घोळका करून थांबत आहेत. त्यामुळेही गंभीर अपघात घडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.

पार्किंगमुळे समस्या निर्माण

या रस्त्यावर बऱयाचवेळा लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. तेव्हा तातडीने गतिरोधक बसावेत, अशी मागणी होत आहे. सायकल ट्रकवर दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत तर काही जण रस्त्यावरच दुचाकी पार्किंग करत आहेत. त्यामुळे देखील समस्या निर्माण होत आहेत. तेव्हा गतिरोधक बसवावेत, अशी मागणी जोर धरत आहेत.

Related Stories

अधिकृत आदेश येईपर्यंत सलून उघडू नका

Patil_p

मुलींनी स्वसंरक्षणासाठी सज्ज असणे आवश्यक

Omkar B

निपाणी-चिकोडीतील सात बंधारे पाण्याखाली

Omkar B

मुंदगोडमध्ये ग्राम पंचायत निवडणुकीनिमित्त बैठक

Patil_p

हालगा येथील मरगाईदेवी मंदिराचा लोकार्पण सोहळा आज

Patil_p

कर्नाटक : विद्यार्थ्यांची शिक्षकांना मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Archana Banage