बेळगाव : मारुती गल्ली अनगोळ येथील मारुती मंदिर जीर्णोद्धार कमिटिच्यावतीने कुमठा कारवार येथून नवीन रथ तयार करून घेण्यात आला आहे. त्यानिमित्त दि. 23 रोजी या रथाची मिरवणूक व 24 रोजी होमहवन, प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण राज्यात आणि बेळगाव जिल्हय़ात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कठोर लॉकडाऊन नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच रात्री व विकेंड कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे नवीन रथाची मिरवणूक व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचे संकट टळल्यानंतर तसेच लॉकडाऊन उघडल्यानंतर या नवीन रथाची मिरवणूक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल तरी सर्व नागरिकांनी देणगीदार तसेच गावातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन हनुमान रथ जीर्णोद्धार कमिटिच्यावतीने करण्यात आले आह.


previous post