Tarun Bharat

अनगोळ मारूती मंदिराच्या रथाचे 8 रोजी होणार आगमन

10 रोजी महाप्रसाद

प्रतिनिधी /बेळगाव

मारूती गल्ली अनगोळ येथील मारुती मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान आहे. या मंदिराचा पुरातन रथ कमकुवत झाल्यामुळे नवीन रथाची निर्मिती करण्यात आली आहे. दरवषी हनुमान जयंतीला मारूती मूर्तीची रथातून मिरवणूक काढण्याची धार्मिक परंपरा आहे. गावातील नागरिक व भाविकांनी दिलेल्या देणगीतून या रथाची निर्मिती करण्यात आली आहे. शुक्रवार दि. 8 रोजी सकाळी 9 वा. मराठी शाळेपासून मिरवणुकीने रथ आणण्यात येणार आहे. यावेळी गावातील सर्व मंडळे, भाविकांनी उपस्थित रहावे. महिलांनी कळशी घेऊन मराठी शाळेसमोर उपस्थित रहावे.

शनिवार दि. 9 रोजी सकाळी 6 वा. अभिषेक, महाआरती व होम करण्यात येणार आहे. सायंकाळी 5 वा. सत्कार समारंभ व प्रदीप सुतार यांचा पोवाडय़ाचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 10 रोजी सकाळी 8 वा. पंच मंडळीतर्फे गावातील सर्व देवी देवतांना नारळ फोडणे, ओटी भरणे कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 7 वा. महाप्रसादाला सुरूवात होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

वरदराज चषक हाफपिच क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

Amit Kulkarni

कन्नड अभिनेते सुदीप यांचा रोड शो

Amit Kulkarni

परिवहन कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन

Amit Kulkarni

रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी उपाययोजना

Patil_p

शाळा इमारत बांधकाम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

पाणीपुरवठा कामगारांचे आंदोलन : पाणीपुरवठा ठप्प

Amit Kulkarni
error: Content is protected !!