Tarun Bharat

अनगोळ येथील वृद्धाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

प्रतिनिधी \ बेळगाव

रेल्वेरूळ ओलांडताना भांदूर गल्ली, अनगोळ येथील एका वृद्धाचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाला. सोमवारी दुपारी चौथ्या रेल्वेगेटजवळ ही घटना घडली असून बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

हावण्णा भुजंग जवरुचे (वय 58) असे त्या दुर्दैवीचे नाव आहे. हावण्णा हे उद्यमबागमधील एका कारखान्यात काम करीत होते. रेल्वेरूळ ओलांडताना रेल्वेची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Related Stories

जैन धर्माचे संदेश आत्मसात करणे गरजेचे – आमदार लक्ष्मी हेब्बाळकर

Rohit Salunke

वडगावमध्ये म्हैस पळविण्याच्या शर्यतीला अमाप प्रतिसाद

Amit Kulkarni

खानापूर तालुक्यातील ब्रिटिशकालीन महसूल विभागांची पुनर्रचना आवश्यक

Amit Kulkarni

बसपास विभागातून 3 हजार पास वितरित

Amit Kulkarni

प्रयत्नतर्फे निराधार केंद्राला मदत

Amit Kulkarni

‘पीएनजी’मध्ये गुंजन महोत्सवाचा शुभारंभ

Patil_p