Tarun Bharat

अनगोळ येथे कलमेश्वर मंदिर परिसरात सीमोल्लंघन उत्साहात

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ ग्रामदेवता श्री कलमेश्वर मंदिर येथे शुक्रवारी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यंदाही दसरा पालखी सोहळा आणि सीमोल्लंघनाचा कार्यक्रम प्रशासकीय नियमानुसार आयोजित करण्यात आला होता.

अनगोळ येथील पालखी दरवर्षी घुमटमाळ अनगोळ या सीमेवर असलेल्या मारुती मंदिर येथे नेण्यात येते. या ठिकाणी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. पण शासनाने यंदाही परवानगी नाकारल्याने कमिटीच्यावतीने अनगोळ येथील कलमेश्वर मंदिरसमोर हा कार्यक्रम पार पडला. दुपारी 4 वाजता मंदिरात देवाची विधिवत पूजा करण्यात आली. देवाला पालखीत बसविण्यात आले. मानकरी आणि गावातील पंच कमिटीच्या उपस्थितीत पालखी मंदिराच्या आवारात पाच प्रदक्षिणेसाठी फिरविण्यात आली. मंदिरसमोर हक्कदार बनोशी कुटुंबीयांच्या हस्ते आपटय़ाच्या झाडाची फांदी पुरविण्यात आली. यावेळी गावचे पुजारी यांनी देवाला गाऱहाणे घातले. गावचे पोलीस पाटील अप्पय्या पाटील यांच्या हस्ते पूजन केले. त्यानंतर नागरिक आणि युवकांनी सोने लुटले व एकमेकांना दसऱयाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Stories

बाळे कुंद्री परिसरात तुरळक पावसामुळे शेती कामात अडसर

Patil_p

पाणीगळतीबाबत अधिकाऱयांच्या डोळय़ावर पट्टी

Omkar B

बटर विक्री करणाऱयाच्या मुलीने मिळविले 95.04 टक्के गुण

Patil_p

अथणीत कोरोना योद्धय़ांना जेवणाची सोय

Patil_p

बेळगाव जिल्हय़ात गुरूवारी 218 जणांना कोरोनाची लागण

Rohan_P

नोव्हेंबर महिन्यात 10 दिवस सरकारी कार्यालयांना सुटी

Amit Kulkarni
error: Content is protected !!