Tarun Bharat

अनगोळ येथे डेनेजचे पाणी गटारीत

दुर्गंधीमुळे जनता वैतागली, तातडीने दुरुस्त करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ राजहंस गल्ली येथे गेल्या चार ते पाच दिवसांपासून डेनेज चेंबरमधून पाणी वाहत आहे. ते पाणी गटारीतून पुढे जात आहे. मात्र यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून तातडीने त्या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून होत आहे. दरम्यान, या डेनेजचे पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरत आहे. त्यामुळे जीवन जगणे मुश्किल झाले आहे.

चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे डेनेज पाईपमध्ये पाणी शिरले. त्यामुळे कचरा अडकून डेनेज ब्लॉक झाला आहे. त्याची सफाई होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या कर्मचाऱयांनी सदर चेंबरच्या बाजुला चर काढुन त्याचे झाकण उघडून त्यामधील पाणी गटारीत सोडले आहे. गटारीमधून रात्रंदिवस पाणी वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. या दुर्गंधीमुळे दरवाजे उघडे ठेवणे मुश्किल झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अनगोळ परिसरात डेंग्युचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. त्यातच हा प्रकार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. डेंग्युंच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. तेंव्हा तातडीने त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी अनगोळ परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Related Stories

निग्यानट्टी येथे बेकायदा दारू जप्त

Omkar B

टर्फ मैदानाच्या कराराबाबत बैठकीत चर्चा

Amit Kulkarni

बाटल्या वेचण्यासाठी येऊन त्या करतात चोरी!

Patil_p

क्लोजडाऊन शब्द ऐकताच मद्यशौकिनांची तारांबळ

Amit Kulkarni

पिरनवाडी येथे टँकरच्या धडकेत वृद्ध ठार

mithun mane

आधार नोंदणीसाठी पोस्ट कार्यालयात गर्दी

Patil_p