Tarun Bharat

अनगोळ-वडगाव मार्गावरील धोकादायक फांद्या हटवा

स्थानिकांची मागणी : कमी उंचीवर लेंबकळत असल्याने धोका

प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ-वडगाव मार्गावर लोंबकळणाऱया झाडाच्या फांद्या धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणे धोक्मयाचे बनत आहे. शिवाय वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे. या धोकादायक फांद्या तात्काळ हटवाव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

अनगोळ संत मीरा शाळेच्याजवळ असलेल्या सर्कलमधून विद्यानगर, भाग्यनगर आणि वडगावला जाण्यासाठी रस्ते जोडले गेले आहेत. या ठिकाणीच मोठे वृक्ष आहेत. या वृक्षांच्या फांद्या रस्त्यात लोंबकळत आहेत. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱया अवजड वाहनांसाठी त्रासदायक ठरत आहेत. शिवाय जमिनीपासून कमी उंचीवर लोंबकळणाऱया फांद्यांचा सातत्याने अवजड वाहनांना स्पर्श होऊ लागला आहे. त्यामुळे कोणताही अनर्थ घडू शकतो.

धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर

मागील पंधरा दिवसांपूर्वी धोकादायक झाडामुळे एका युवकाचा बळी गेला आहे. त्यापाठोपाठ झाडांची पडझड सातत्याने सुरू होती. त्यामुळे शहरातील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे अशी धोकादायक झाडे वेळेत हटविणे गरजेचे आहे. येथील रस्त्यावर लोंबकळणाऱया फांद्या तातडीने हटवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Stories

सुस्थितीत असलेल्या रस्त्याची खोदाई

Amit Kulkarni

विविध ठिकाणी संभाजी महाराजांना अभिवादन

Amit Kulkarni

तिसरे रेल्वेगेट उद्या राहणार बंद

Amit Kulkarni

फेसबुक प्रेन्डस् सर्कलतर्फे बिम्स्ला ब्लॅंकेटस्

Patil_p

एपीएमसीत कांदा दरात मोठी घसरण

Amit Kulkarni

स्वच्छता कामगारांचे माजी महापौरांकडून अभिनंदन

Patil_p