Tarun Bharat

अनगोळ-वडगाव रस्ता रुंदीकरण काम युद्धपातळीवर

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. मागील दोन वर्षे ही प्रक्रिया थंडावली होती. मात्र, आता अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हा रस्ता 60 फुटांचा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, नागरिकांच्या तक्रारीमुळे 45 फुटांचा करण्यात येत आहे. यामुळेदेखील काही इमारतींचे नुकसान झाले आहे.

शहरातील वाहनांची संख्या वाढत आहे. शहराची व्याप्ती वाढल्याने रस्त्यांचे रुंदीकरणही करण्यात येत आहे. यापूर्वी विविध रस्त्यांचे रुंदीकरण महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गतही काही रस्त्यांचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करण्यात आले. नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून अडचणींचे निवारण करण्याच्यादृष्टीने रुंदीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. दक्षिण भागातील विविध रस्ते अरुंद होते. त्यामुळे बहुतांश रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. अलीकडेच अनगोळ-वडगाव संपर्क रस्त्याच्या रुंदीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. सदर रस्ता अनगोळ-वडगाव उपनगरातील रहिवाशांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्याशेजारी विविध वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याचा विकास व्हावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली होती.

या रस्त्याचे डांबरीकरण वेळोवेळी करण्यात आले होते. पण रहदारी वाढल्याने हा रस्ता खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. अवजड वाहने व बस वाहतुकीसाठी हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे आला आहे. या रस्त्याची रुंदी 60 फूट करण्याचा विचार होता. मात्र, यामुळे रस्त्याशेजारील इमारतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होण्याची शक्मयता आहे. याबाबत चर्चा करून या रस्त्याची रुंदी 45 फूट करण्याचा तोडगा काढून रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले. पण 45 फुटांचा रस्ता करीत असतानादेखील काही इमारतींच्या समोरील भागाचे नुकसान झाले आहे. मात्र, विहिरी व मुख्य इमारतींचा भाग हटविण्यात आला नाही. सदर रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर नागरिकांना सोयीचे होणार आहे.

Related Stories

न्यायालयाच्या आवारात पार्किंगला मनाईने गोंधळ

Patil_p

धारवाड रोडवरील ‘त्या’ समस्येचे निवारण

Amit Kulkarni

जाधवनगर येथे बिबट्याची दहशत

Rohit Salunke

कर्नाटकः रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले

Archana Banage

शहर परिसरात वीजमीटरचा तुटवडा

Patil_p

1249 ग्रा. पं. कर्मचारी सुविधांविना

Amit Kulkarni