Tarun Bharat

अनन्या अन् ईशान करत आहेत परस्परांना डेट

Advertisements

अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे दीर्घकाळापासून परस्परांना डेट करत असल्याचे वृत्त चर्चेत आहे. अलिकडेच दोघेही राजस्थानच्या रणथंबोर राष्ट्रीय उद्यानात व्हेकेशन संपवून मुंबईत परतले आहेत. दोघांनी स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर व्हेकेशनची छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर केल्या आहेत, ज्यात ते जंगलातील वातावरणाचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

ईशान आणि अनन्या स्वतःच्या नात्याला मजबूत करत असल्याचे वृत्त आहे. परंतु दोघेही हे नातेसंबंध खासगी ठेवू इच्छित आहेत. दोघांनीही स्वतःच्या नात्याबद्दल अधिकृत पुष्टी दिलेली नाही. परंतु चित्रपटसृष्टीत अनन्या आणि ईशान हे परस्परांना डेट करत असल्याचे लपून राहिलेले नाही.

अनन्या आणि ईशान यांनी मकबूल खान यांच्या दिग्दर्शनातील चित्रपट खाली पीलीमध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2020 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 वर प्रदर्शित करण्यात आला होता. तर अनन्या पांडे लवकरच शकुन बत्राचा चित्रपट ‘गहराइयां’मध्ये अभिनेत्री दीपिका पदूकोन आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत दिसून येणार आहे.

Related Stories

ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार जान्हवी कपूर

Omkar B

ऍक्शनपट ‘मुंबई सागा’चा टीझर प्रदर्शित

Patil_p

अभिनेत्री मौनी रॉय विवाहबद्ध

Sumit Tambekar

अभिनेत्रीसह लेखिका झाली तमन्ना भाटिया

Patil_p

अभिनेता रितेश देशमुखकडून राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा!

Rohan_P

सर्वाधिक सुवर्ण मोहोर मिळविणारी डान्सिंग क्वीन पूर्वा शिंदे

Patil_p
error: Content is protected !!