Tarun Bharat

अनन्या आणि ईशान रमले सिक्रेट व्हेकेशनमध्ये

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रिटी कलाकार नेहमीच परदेशातील नवनवी डेस्टीनेशन्स शोधत असतात. त्यातही मालदीव हे कलाकारांचे हॉट डेस्टीनेशन बनले आहे. सध्या अभिनेता अक्षय कुमार मालदीवमध्ये फॅमिलीसोबत सुटीचा आनंद घेतोय. निळय़ाशार बेटावरील सायकलिंगचे फोटो त्याने शेअर केले आहेत. इतकेच नव्हे तर नव्या वर्षाची सकाळ त्याने मालदीवच्या बेटावरील रिसॉर्टच्या बाल्कनीत गायत्रीमंत्र म्हणून साजरी केल्याचे फोटोही त्याने शेअर केले आहे. बॉलीवूडमधील लव्हबर्डस कियारा अडवानी आणि सिध्दार्थ मल्होत्रा ही जोडीही सध्या एकत्र मालदीवमध्ये आहे. तर विराट कोहली आणि अनुष्का शर्माने मुलगी वामिकासोबत दक्षिण अफ्रिका गाठलं आहे. बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि ईशान खटटर यांनीही त्यांच्या एकत्र व्हेकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत पण ते कुठल्या डेस्टिनेशनवर आहेत हे मात्र त्यांनी सिक्रेट ठेवले आहे. त्यामुळे याची चर्चा सोशलमीडियावर रंगली आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता इशान खट्टर यांच्या अफेअर्सच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत. दोघांना अनेक वेळा सिनेमांच्या प्रिमियम, पाटर्य़ांना स्पॉट केले आहे. सोशल मीडियावर देखील दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा पहायला मिळत आहेत.  अनेक सेलिब्रेटी सीक्रेट व्हेकेशन्सवर गेले आहेत. इशान आणि अनन्या देखील सध्या एका सीक्रेट व्हेकेशन्सवर आहेत. सध्या दोघेही नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी एकत्र सेलिब्रेशन करत आहेत. दोघेही एकाच ठिकाणी सुटय़ांचा आनंद घेत आहेत. याचे काही पुरावे देखील समोर आले आहेत. त्यामुळे दोघेही पुन्हा एकदा लाइमलाइटमध्ये आले आहेत.

2021च्या सुरुवातीलाही इशान आणि अनन्या एकत्र सुटय़ांसाठी गेले होते. यंदा देखील दोघेही सीक्रेट जागेवर नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. इशान आणि अनन्याने त्याच्या सोशल मीडियावर एकच फोटो शेअर केला आहे. दोघेही जंगल सफारीचा आनंद घेत असल्याचे सांगितले जात आहे. दोघांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये चांदण्यांनी भरलेले आभाळ आणि झाडे दिसत आहेत. दोघांची इन्स्टाग्राम स्टोरी पाहून त्यांचे फॅन्स देखील अवाक झालेत. दोघेही सीक्रेट व्हेकेशन्सवर असल्याचे समोर आले आहे. अनन्या पांडे आणि ईशान खट्टर यांनी 2020मध्ये ‘खाली पीली’ या सिनेमात एकत्र काम केले होते. त्यानंतर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरू झाली. सिनेमाच्या शुटींगदरम्यान दोघे फार जवळ आले होते. सिनेमाच्या रिलीज नंतरही दोघांच्या प्रेमाचा सिलसिला कायम राहिला. अनन्याचे आगामी काळात दोन सिनेमे रिलीज होणार आहेत. विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ आणि दीपिका पादुकोण, धीर्या करवा, सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘गहराइया’ या सिनेमातही अनन्या दिसणार आहे. ईशान आगामी काळात पिप्पा आणि फोन भूत या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संकलन – अनुराधा कदम

Related Stories

दुती चंदचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

datta jadhav

तीन दहशतवाद्यांना शोपियानमध्ये अटक

Patil_p

आंध्र प्रदेशात एका खाजगी कंपनीत गॅस गळती; दोघांचा मृत्यू

Tousif Mujawar

चेन्नईमध्ये यलो अलर्ट

Patil_p

सोमनाथ रेल्वेस्थानकाचा होणार कायापालट

Patil_p

“बापाकडून” “बेट्यावर” परोपकार, पाकला देणार 4.5 कोटी डोस

datta jadhav