Tarun Bharat

अनन्या पांडेची ओटीटीमध्ये एंट्री

Advertisements

‘कॉल मी बे’मध्ये साकारणार भूमिका

अभिनेत्री अनन्या पांडेचे आतापर्यंत काही चित्रपट प्रदर्शित झाले असले तरीही तिला स्वतःचा ठसा उमटविता आलेला नाही. अशा स्थितीत अनन्या आता ओटीटीवर एंट्री घेणार आहे. अनन्या लवकरच धर्माटिक एंटरटेनमेंटचा चित्रपट ‘कॉल मी बे’मध्ये दिसून येणार आहे. अनन्या या चित्रपटात एका श्रीमंत घरातील युवतीची भूमिका साकारणार आहे. फॅशन जगातील संघर्ष या चित्रपटात दर्शविण्यात येणार आहे.

अनन्या पांडेच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन कॉलिन डी कुन्हा करणार आहेत. कुन्हा यांनी संजू चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. या चित्रपटाची कहाणी इशिता मोइत्रा, समीना मोटलेकर आणि रोहित नायर यांनी लिहिली आहे.

करण जौहर या निर्मात्याची अनन्या पांडे निकटवर्तीय मानली जाते. अनन्याचे वडिल चंकी पांडे हे अनेक वर्षापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. अनन्याने स्वतःच्या कारकीर्दीची सुरुवात धर्मा प्रॉडक्शनचा चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द ईयर 2’द्वारे केली होती.

अनन्या लवकरच आयुष्मान खुरानासोबत ‘ड्रीम गर्ल 2’ या चित्रपटात दिसून येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. अनन्याने या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरुवात केल्याचे समजते.

Related Stories

‘तान्हाजी’ने जिंकला बॉक्स ऑफिसचा गड

Archana Banage

अहाना कुमराने केले स्वप्न पूर्ण

Amit Kulkarni

कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड

Archana Banage

बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी केली आत्महत्या

Tousif Mujawar

पत्नीला मारहाण केल्याने अटकेत असलेल्या अभिनेता करण मेहराला मिळाला जामीन

Tousif Mujawar

‘इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहा’, सोनम कपूरचा देशवासीयांना सल्ला

tarunbharat
error: Content is protected !!