Tarun Bharat

अनशी घाटातील मार्ग वाहतुकीस खुला करा

वार्ताहर /रामनगर

बेळगाव-कारवार मार्गावरील अनशी घाटात दि. 5 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून मार्ग बंद झाला आहे. तर एका ठिकाणी रस्ता असल्याचा सुगावाही लागत नाही. दरड कोसळलेल्या ठिकाणी कारवार जिल्हाधिकाऱयांनी तसेच अनेक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन या मार्गावरील दरड बाजूला काढून लवकरच वाहतूक सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

 मात्र या मार्गाची पाहणी करून तीन आठवडे झाले तरी अद्याप या मार्गावरील दरड बाजुला करण्यात आली नाही. त्यामुळे हा मार्ग सुरू होण्यास नक्की किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे. जोयडा तालुक्मयातील नागरिकांना कारवार जिल्हय़ात सरकारी कामे करण्यासाठी जाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे येथील अनेक नागरिकांची कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या मार्गावरील कोसळलेली दरड बाजुला सारून महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

मराठी फलकांसाठी म. ए. समितीचे निवेदन

Amit Kulkarni

तालुक्यात बटाटा काढणीला प्रारंभ

Amit Kulkarni

सकाळची बेंगळूर फेरी होणार पूर्ववत

Patil_p

गुंजीत आखेर स्वयंघोषित सीलडाऊन, गावातील सर्वच रस्ते बंद

Patil_p

मतदारयादी विभाजनाचे काम युद्धपातळीवर

Amit Kulkarni

बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

Patil_p