Tarun Bharat

अनिल अंबानींना ‘या’ बँकेच्या निर्णयाने मोठा झटका

मुंबई/प्रतिनिधी

कर्जाच्या विळख्यात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानींच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण, कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले १६० कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेला यासंदर्भात सूचित करण्यात आले असून त्यामुळे अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

कर्नाटक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही २०१४ पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करत आहोत. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत आमचा ०.३९ टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये १.९८टक्के इतका हिस्सा आहे. दोन्ही कर्जांसाठी १०० टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदवण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्नाटक बँकेकडून सांगण्यात आले. बँकेच्या या निर्णयामुळे अनिल अंबानी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Related Stories

अल्पवयीन विवाहांची वैधता तपासणार

Patil_p

स्थानिक भूमिपुत्रांसह पुणे, मुंबईवरून आलेल्यांना रोजगाराची सुवर्णसंधी

Patil_p

लव्ह जिहादविरोधी विधेयक मध्यप्रदेश मंत्रिमंडळात मंजूर

Patil_p

बदलाची फक्त गुगली, दादांची विकेट वाचली!

Patil_p

संसर्ग जोरात, पण सौम्य लक्षणांमुळे दिलासा

Amit Kulkarni

डॉ. दाभोलकरांच्या नावाने अध्यासन उभारावे : जावळे

Patil_p
error: Content is protected !!