Tarun Bharat

अनिल अंबानी यांच्या कंपनीसमोर नवी अडचण

संरक्षण मंत्रालयाने रिलायन्स नेवलचे कंत्राट केले रद्द

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अनिल अंबानी यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. संरक्षण मंत्रालयाने रिलायन्स नेवल अँड इंजिनियरिंग लिमिटेड (आरएनईएल) दिलेले 2,500 कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले आहे. यांतर्गत रिलायन्स नेवलला भारतीय नौदलाला गस्तनौकांचा पुरवठा करायचा होता, परंतु विलंबामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.

अनिल अंबानी यांनी कंपनी असलेल्या रिलायन्स नेवल अँड इंजिनियरिंगच्या विरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या अहमदाबाद येथील खंडपीठात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे. 

कंपनी खरेदीची इच्छा

12 कंपन्यांनी रिलायन्स नेवलला खरेदी करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. या कंपन्यांमध्ये एपीएम टर्मिनल्स, युनायटेड शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन (रशिया), हेजल मर्केंटाइल लिमिटेड, चौगुले समूह, इंटरप्स (अमेरिका), नेक्स्ट ऑर्बिट वेंचर्स, एआरसीआयएल, आयएआरसी, जेएमएआरसी, सीएफएम एआरसी, इन्वेंट एआरसी आणि फियोनिक्स एआरसी सामील आहे.

Related Stories

सिंधू बॉर्डरवर शेतकरी-स्थानिकांमध्ये संघर्ष पेटला

datta jadhav

ओपेकचा उत्पादन वाढविण्याचा निर्णय

Patil_p

भारत-अमेरिका सैनिक सरावाचा प्रारंभ ‘कबड्डी’ने

Patil_p

”गुजरातमध्ये ६ हजार कोटींचा कोळसा घोटाळा”

Abhijeet Khandekar

डेहराडून बलात्कार प्रकरणी 20 वर्षांची शिक्षा

Patil_p

लसीकरण धोरणाची झाडाझडती

Patil_p