Tarun Bharat

अनिल अंबानी विकणार वीज कंपन्यांमधील हिस्सा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

उद्योगपती अनिल अंबानी यांनी दिल्लीतील बीएसईएस आणि यमुना डिस्कॉम्स या वीज वितरण कंपनीतील हिस्सा विकायला काढला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत असलेल्या या दोन कंपन्यांमधील हिस्सा विकण्यासाठी त्यांनी केपीएमजीला हायर केले आहे. केपीएमजीला या व्यवहारात खरेदीदार शोधण्यापासून ते हा व्यवहार पूर्ण करण्याचे अधिकार देण्यात आल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.  

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी वीज वितरण कंपनीतील भाग विकायला काढले आहेत. अनिल अंबानी यांनी दोन्ही कंपन्यांमधील 51 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांचे मिळून सध्या 44 लाख ग्राहक आहेत. ग्रिनको एनर्जी,  ब्रुकफिल्ड असेट्स मॅनेजमेंट, टोरंट पावर यासह 8 कंपन्या या व्यवहारास उत्सुक आहेत. 

यापूर्वीही अनिल अंबानी यांनी रिलायन्स एनर्जी ही वीज वितरण कंपनी अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकली होती. त्यामधून त्यांना 18 हजार 800 कोटी रुपये मिळाले होते.

Related Stories

मास्टर ब्लास्टर सचिनकडून खास फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

Tousif Mujawar

दक्षिण आफ्रिकेत पुराचा कहर, जनजीवन विस्कळीत

Archana Banage

नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

परीक्षांसंबंधी आज महत्त्वाचा निर्णय शक्य

Patil_p

राफेलची पहिली तुकडी 27 जुलैला भारतात दाखल होणार

datta jadhav

Budget 2021 : रेल्वे सेवा सुविधेच्या विकासासाठी मोठ्या निधीची तरतूद

Archana Banage
error: Content is protected !!