Tarun Bharat

अनिल देशमुखांना ईडी चौकशीला सामोरे जाऊन तुरुंगात जाव लागणार – किरीट सोमय्या


मुंबई \ ऑनलाईन टीम

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुली प्रकरणात सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या कारवाईवरुन भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देशमुखांवर जोरदार निशाणा साधलाय. अनिल देशमुख १०० कोटी वसुली प्रकरणात ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहत नाहीत परंतु त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आणि तुरुंगातही जावं लागणार अशी खात्री आहे. किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे की, अनिल देशमुख यांनी १०० कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केलं आहे. नागपूर, मुंबई,उरण, जेएनपीटी येथे जमीन घेणे आपला पैसा चॅरिटेबल ट्रस्ट, एज्युकेशन ट्रस्ट, कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणे याचा हिशोब आता ईडी मागत आहे. अनिल देशमुख यांना ईडीच्या चौकशीसाठी समोर यावं लागणार आहे. १०० कोटीचा आर्थिक घोटाळा आणि अवैध संपत्तीमुळे जेलमध्ये जावं लागणार आहे असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यामध्ये त्यांचा वरळीमधील सुखदा या इमारतीमधील डुप्लेक्स फ्लॅटपैकी एक फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. हा प्लॅट देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावावर आहे. या फ्लॅटची किंमत 1 कोटी 54 लाख रुपये आहे. दुसरीकडे उरणजवळील धुतूम गावात देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांच्या कंपनीकडून जमीन खरेदी करण्यात आली होती. त्या जमिनीतील काही फ्लॅटवर ईडीकडून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत 2 कोटी 67 लाख रुपये आहे. त्याचबरोबर देशमुख यांची नागपुरातील काही मालमत्ताही सील करण्यात आल्याचं बोललं जात आहे. 

Related Stories

कोरोना रुग्णालाच रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची वणवण (व्हिडिओ)

Archana Banage

कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

मिरचीशेठचा बाजार रस्त्यातच

Patil_p

कर्दे बीचवर पाचगणीचा युवक बुडाला

Patil_p

दहशतवादी कट उधळला; ISI च्या दोन दहशतवाद्यांना दिल्लीत अटक

datta jadhav

बीड हादरलं! भाजप शहराध्यक्षाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

datta jadhav